Cambodia King to Visit India: तब्बल 60 वर्षांनी कंबोडियाच्या राजाचा भारत दौरा

India-Cambodia: दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत आहेत. दोन्ही देशांमधले हे संबंध अधिक दृढ होण्यासाठी ही भेट विशेष आहे. यावेळी दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
King Of Cambodia NORODOM SIHAMONI
King Of Cambodia NORODOM SIHAMONIDainik GOmantak
Published on
Updated on

Cambodia King to Visit India

जवळपास 60 वर्षांनंतर कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी तीन दिवसांच्या (मे 29-31) भारत दौऱ्यावर येत आहेत. यपुर्वी त्यांचे वडील सहा दशकांपूर्वी भारतात आले होते. आता सिहामोनीचे स्वागत करण्यासाठी भारत रेड कार्पेट अंथरून सज्ज झाला आहे. कंबोडियाचे राजा सिहामोनी २९ मे रोजी दिल्लीत येणार आहेत.

भारत आणि कंबोडिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या खास निमित्ताने ते भारत दौऱ्यावर येत आहेत. 1952 मध्ये दोन्ही देशांमध्ये (भारत-कंबोडिया) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

भारत दौऱ्यादरम्यान कंबोडियाचे राजा सिहामोनी यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या शिष्टमंडळात रॉयल पॅलेसचे मंत्री, परराष्ट्र मंत्री यांच्यासह एकूण 27 अधिकारी असतील.

30 मे रोजी राजाच्या सन्मानार्थ राज्य मेजवानी

30 मे रोजी राष्ट्रपती भवनात त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ते राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संध्याकाळी राजाच्या सन्मानार्थ राज्य मेजवानीचे आयोजन करतील. आपल्या दौऱ्यात कंबोडियाचे राजा सिहामोनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत.

सिहामोनी यांच्या वडीलांचा 1963 मध्ये भारत दौरा

याशिवाय ते उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत. सुमारे सहा दशकांपूर्वी 1963 मध्ये नोरोडोम सिहामोनी यांचे वडील भारत भेटीवर आले होते. सिहामोनी यांच्या भारत भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांच्या या भेटीमुळे भारत आणि कंबोडिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील.

King Of Cambodia NORODOM SIHAMONI
Ramdev Baba in Support Of Wrestlers: रामदेवबाबा म्हणतायेत, ब्रिजभूषण यांची जागा तुरुंगातच...

या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे

दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत आहेत. दोन्ही देशांमधले हे संबंध अधिक दृढ होण्यासाठी सिहामोनी यांची ही भेट विशेष आहे. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये वातावरण बदल, दोन्ही देशांतील व्यापार, शैक्षणिक व सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर चर्चा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com