Kidney Bilateral Wilms Tumor: देशात पहिल्यांदाच पार पडली किडनी बायलेटरल विल्म्स ट्यूमर शस्त्रक्रिया; जाणून घ्या काय आहे हा आजार?

Kidney Bilateral Wilms Tumor Surgery: भारतीय डॉक्टरांनी उझबेकीस्तानमधील एका 6 वर्षाच्या मुलाची मृत्यूच्या तावडीतून सुटका केली. उमिद जॉन असे या मुलाचे नाव आहे.
Kidney Bilateral Wilms Tumor: देशात पहिल्यांदाच पार पडली किडनी बायलेटरल विल्म्स ट्यूमर शस्त्रक्रिया; जाणून घ्या काय आहे हा आजार?
Kidney Bilateral Wilms Tumor SurgeryDainik Gomantak
Published on
Updated on

Kidney Bilateral Wilms Tumor Surgery: भारतीय डॉक्टरांनी उझबेकीस्तानमधील एका 6 वर्षाच्या मुलाची मृत्यूच्या तावडीतून सुटका केली. उमिद जॉन असे या मुलाचे नाव आहे. जॉनच्या दोन्ही किडनी कॅन्सरने ग्रस्त होत्या. जॉनच्या आईला देखील आपला मुलगा वाचणार नाही असे वाटत होते. मात्र भारतीय डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन जॉनची मृत्यूच्या जंजाळातून सुटका केली. आज जॉन पूर्णपणे ठणठणीत आहे. डॉ. परेश जैन आणि त्यांच्या टीमसमोर शस्त्रक्रियेचे आव्हान होते. विशेष म्हणजे, ते अशाप्रकारची केस पहिल्यांदाच हाताळत होते. परंतु संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया कार्यक्षमतेने हाताळण्यात आली आणि धोका कमीत कमी करण्यात आला. परिणामी, भारतात पहिल्यांदाच फोर्टिस एस्कॉर्ट्स ओखलाच्या टीमने अशी शस्त्रक्रिया करुन यश मिळवले. डॉ. परेश जैन यांनी या आजारावरील उपचार आणि त्या संबंधित जोखीम याबद्दल सविस्तर माहिती दिली.

आशा पल्लवित झाल्या

दरम्यान, जॉन आता पूर्णपणे बरा आहे. डॉक्टरांना आशा आहे की, त्याला पुन्हा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासणार नाही. तो सामान्य जीवन जगू शकेल. उमिदच्या आईने सांगितले की, उझबेकिस्तानमध्ये मुलावर उपचार करताना तिला वाटले नव्हते की, त्याला वाचवता येईल, त्यानंतर कुटुंब भारतात पोहोचले आणि फोर्टिस एस्कॉर्ट्सच्या डॉक्टरांनी त्याच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित केल्या. डॉ. परेश जैन यांनी ही शस्त्रक्रिया एका मिशनसारखी घेतली आणि आज जॉन पूर्णपणे निरोगी आहे.

किडनी बायलॅटरल विल्म्स ट्यूमर म्हणजे काय?

किडनी बायलेटरल विल्म्स ट्यूमर म्हणजे रुग्णाच्या दोन्ही किडनींमध्ये ट्यूमर असतात. विल्म्स ट्यूमर हा किडनीतील सर्वात धोकादायक ट्यूमर मानला जातो. मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. ही गाठ सहसा फक्त एकाच किडनीत होते, परंतु काही प्रकरणांमध्ये ती दोन्ही किडनीमध्ये देखील आढळते. अशा परिस्थितीत रुग्णावर शस्त्रक्रिया करणे खूप कठीण असते.

Kidney Bilateral Wilms Tumor: देशात पहिल्यांदाच पार पडली किडनी बायलेटरल विल्म्स ट्यूमर शस्त्रक्रिया; जाणून घ्या काय आहे हा आजार?
Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका

डॉक्टरांच्या देखरेखीखाली

पुढील दोन वर्षे, डॉक्टर दर तीन महिन्यांनी उमिद जॉनचा पाठपुरावा करत राहतील. त्याच्या कुटुंबाला इंग्रजी किंवा कोणतीही भारतीय भाषा समजत नाही, परंतु एका व्यक्तीने डॉक्टर आणि कुटुंबातील दुवा म्हणून काम केले.

जगात आतापर्यंत 16 प्रकरणे नोंदवली गेली

जगात आतापर्यंत फक्त 16 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जॉन कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात पोहोचला होता, परंतु डॉक्टरांच्या कठोर परिश्रमामुळे जॉनची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आज तो निरोगी आयुष्य जगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com