Kia Syros Launch: दमदार मायलेज अन् भन्नाट फिचर्स, भारतात लाँच झाली 'किया'ची नवीन कार, किंमत जाणून घ्या

Kia Syros: कोरियाची कार निर्माता कंपनी कियानं किया सिरॉस कार भारतीय बाजारात लाँच केली.
Kia Syros
Kia Syros Dainik Gomantak
Published on
Updated on

Kia Syros India launch

भारतीय बाजरपेठेत सध्या अनेक कार आणि स्कुटर लाँच होत असतात. त्यातच आता दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी कियानं किया सिरॉस (Kia Syros) कार भारतीय बाजारात लाँच केली. कियाच्या या नवीन कारला खास डिझाइन करण्यात आली आहे.

किया सिरॉस या कारचं डिझाइन इतर एसयूव्हीपेक्षा थोडी वेगळी आहे. या कारच्या लूकमध्ये एक नवीन आणि वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे, जी इतर एसयूव्हीपेक्षा वेगळी आहे.

किया सिरॉसमध्ये सेगमेंट-फर्स्ट ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्टम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते. हे इनोव्हेशन सामान्यत: लक्झरी वेईकल्समध्ये पाहायला मिळतं.

Kia Syros
Goa Assembly Session: गोव्यात 24 नाही, 4 तासच पाणी! 'तिळारी'साठी 350 कोटी, टंचाईच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर जून्‍सू चो म्हणाले की, "भारतात एसयूव्‍हीची मागणी वाढत आहे. विशेषत: किया इंडिया नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रित डिझाइनच्‍या माध्‍यमातून ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये शक्‍य असलेल्‍या मर्यादांना दूर करत आहे."

"किया सिरॉस पोर्टफोलिओमधील एसयूव्‍हीच्‍या नवीन प्रजातीला सादर करते. लाँच करण्यात आलेल्या या नवीन कारमध्ये प्रगत तंत्रज्ञान, अपवादात्‍मक आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. कारच्या इंटीरिअर्समध्‍ये शाश्‍वत साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे", असं जून्‍सू चो यांनी सांगितलं.

किया सिरॉसमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्‍टम देण्यात आहे. किया कनेक्‍ट २.० सिस्‍टममध्‍ये ८० हून अधिक वैशिष्‍ट्यांची श्रेणी आहे. कारने किया कनेक्‍ट डायग्‍नोसिस (केसीडी) सादर केलं आहे.

यामुळे दूरूनच त्‍यांच्‍या वेईकलच्‍या स्थितीचे मूल्‍यांकन करण्‍याची सुविधा देते. तसेच अडवान्‍स्‍ड टोटल केअरमुळे (केएटीसी) ग्राहकाला टायर रिप्‍लेसमेंट्स आणि मेन्‍टेनन्‍स अशा आवश्‍यक सर्विसेसबाबत माहिती मिळते.

Kia Syros
Goa Assembly Session: आलेमाव यांचा अहवाल नामंजूर, सार्वजनिक उपक्रम समितीचा कार्यकाळ संपुष्टात; सिक्वेरांचे स्पष्टीकरण

२,५५० मिमी व्‍हीलबेससह कियाची हि नवीन कार प्रवाशांच्‍या आरामदायीपणाला प्राधान्‍य देते. ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे या कारमध्ये सेवा उपलब्ध आहे, ज्‍यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळते.

किंमत: किआच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत ८ लाख ९९ हजार ९०० रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या किमतीत तुम्हाला या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट मिळेल. पण जर तुम्हाला या कारचे टॉप मॉडेल घ्यायचे असेल, तर तुम्हाला १७ लाख ८० हजार रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

किया सिरॉसची वैशिष्ट्ये: किया सिरॉस मध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6-स्पीकर साउंड सिस्टम, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड आहे. ऑटो कनेक्टिव्हिटी, एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

इंजिन: ही एसयूव्ही १.५ लिटर डिझेल इंजिनमध्ये खरेदी करता येईल जी ११५ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार १.० लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह देखील खरेदी करता येणार आहे. जे १२०bhp पॉवर आणि १७२Nm टॉर्क जनरेट करते. हे वाहन ७ स्पीड डीसीटी, ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह खरेदी करता येईल.

Kia Syros
Turtle Nesting Goa: 'कुठलेही प्रकल्प इथे उभे राहू शकत नाहीत; वागातोर किनाऱ्यावरील 'या' पट्ट्याला कासवांचे संवर्धन केंद्र घोषित करा'

मायलेज: किया सिरॉसच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोल इंजिनसह येणारा मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट एक लिटर पेट्रोलमध्ये १८.२० किमी पर्यंत धावू शकते. त्याच वेळी, डीसीटी व्हेरियंट एक लिटर इंधनात १७.६८ किलोमीटरपर्यंत धावेल.

डिझेल इंजिनबद्दल बोलायचे झालं तर, मॅन्युअल व्हेरिएंट एक लिटर इंधनात २०.७५ किमी पर्यंत धावू शकते तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट १७.६५ किमी पर्यंत धावू शकते.

किया सिरॉसच्या पुढील आणि मागील बाजूस व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, अँबियंट लाइटिंग, रियर एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. याशिवाय, लेव्हल २ एडीएएस, ६ एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, ३६० डिग्री कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर असे अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.

कार आठ रंगांमध्‍ये उपलब्‍ध : किया सिरॉस ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, प्‍यूटर ऑलिव्‍ह, इंटेन्‍स रेड, फ्रॉस्‍ट ब्‍ल्‍यू, अरोरा ब्‍लॅक पर्ल, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com