खुशी मुखर्जीला 'सूर्या'शी पंगा घेणं पडलं महागात! 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल; आता म्हणते, "माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला"

Bollywood khushi mukherjee faced 100 crore rupees defamation case: सूर्यकुमार यादव याच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री खुशी मुखर्जी आता मोठ्या कायदेशीर संकटात सापडली आहे.
Bollywood khushi mukherjee faced 100 crore rupees defamation case
Bollywood khushi mukherjee faced 100 crore rupees defamation caseDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री खुशी मुखर्जी आता मोठ्या कायदेशीर संकटात सापडली आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका स्टार क्रिकेटरची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत खुशी मुखर्जीवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. 'पब्लिसिटी स्टंट' म्हणून सुरू झालेला हा प्रकार आता पोलीस कोठडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमका वाद काय आहे?

एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना खुशी मुखर्जीने खळबळजनक दावा केला होता. तिने म्हटले होते की, "मला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करायचे नाही. सूर्यकुमार यादव मला सतत मेसेज करायचा, पण आता आमच्यात बोलणे होत नाही आणि मला माझे नाव त्याच्याशी जोडलेले नको आहे." खुशीच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि सूर्याच्या चाहत्यांनी अभिनेत्रीवर टीकेची झोड उठवली.

१०० कोटींचा दावा

मुंबईतील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी या प्रकरणात उडी घेत खुशी मुखर्जीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. फैजान यांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी केवळ १०० कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केली नाही, तर याप्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवून अभिनेत्रीला किमान ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. फैजान यांच्या मते, ही लढाई केवळ एका खेळाडूची नसून देशाच्या अभिमानाची आहे.

हॅकिंगचे निमित्त आणि 'डैमेज कंट्रोल'

प्रकरण कायदेशीर वळण घेत असल्याचे पाहून खुशी मुखर्जीने आता घूमजाव केले आहे. आपली चूक सुधारण्यासाठी तिने स्पष्टीकरण दिले आहे की, तिच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. इतकेच नव्हे तर, आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावाही तिने केला आहे. आता तिचे म्हणणे आहे की, त्यांच्यातील संवाद केवळ 'मैत्रीपूर्ण' होता आणि एका सामन्यातील पराभवानंतर तिने केवळ सहानुभूती व्यक्त करण्यासाठी मेसेज केला होता.

सूर्यकुमारची प्रतिक्रिया नाही

या सर्व वादावर सूर्यकुमार यादवने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तो सध्या आपल्या आगामी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, गाझीपूर पोलीस या तक्रारीची शहानिशा करत आहेत. जर या प्रकरणात एफआयआर नोंदवला गेला, तर खुशी मुखर्जीला चौकशीसाठी हजर राहावे लागेल. एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीबद्दल विनाधार वक्तव्य करणे किती महागात पडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com