Kerala: 'संविधानविरोधी' वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्र्याने दिला राजीनामा

केरळचे मंत्री साजी चेरियन यांनी 'संविधानविरोधी' वक्तव्यावरुन राजीनामा दिला आहे.
kerala minister saji cheriyan
kerala minister saji cheriyanDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala Minister Saji Cheriyan Resigns: केरळचे मंत्री साजी चेरियन (kerala minister saji cheriyan) यांनी 'संविधानविरोधी' वक्तव्य केल्याप्रकरणी राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी चेरियन म्हणाले होते की, ''प्रत्येकजण म्हणतो की, हे एक चांगले लिहिलेले संविधान आहे. या देशात सर्वात महत्वाचे. परंतु मी म्हणेन, ते या देशातील जनतेला लुटण्यासाठी लिहिले गेले. इंग्रजांनी जे संविधान तयार केले होते तेच घटनाकारांनी लिहिले. 75 वर्षांपासून इथे त्याचे पालन केले जात आहे.'' त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

दरम्यान, मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) च्या वतीने स्थगन प्रस्ताव आणण्याची योजना होती, परंतु तपूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. सभापतींची ही कृती चुकीची असल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्यांनी नंतर त्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

kerala minister saji cheriyan
Kerala: पलक्कडमध्ये RSS कार्यकर्त्याची हत्या, बाईकवरुन आले होते हल्लेखोर

तसेच, केरळचे (Kerala) मत्स्यव्यवसाय मंत्री साजी चेरियन यांनी राज्यघटनेविरुद्ध (Constitution) केलेल्या कथित वक्तव्यावरुन राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत असताना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) प्रमुख नेत्यांनी बुधवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan), सीपीआय(M) चे राज्य सचिव कोडिएरी बालकृष्णन आणि चेरियनसह इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com