...आणि आता स्फोट! केजरीवालांचा पंजाब सरकारवर निशाणा

आप पंजाबमध्ये मजबूत सरकार देईल आणि अशा गुन्ह्यातील सूत्रधारांना शिक्षा देईल. चन्नी सरकार अत्यंत कमकुवत सरकार आहे. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. आज पंजाबला मजबूत आणि कृतीशील सरकारची गरज आहे.
CM Arvind Kejriwal

CM Arvind Kejriwal

Dainik Gomantak

Published on
Updated on

पंजाबमधील आणि लुधियाना बॉम्बस्फोटानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांचे आणखी एक विधान समोर आले आहे. "पहिला अपमान आणि आता लुधियानामधील (Ludhiana) हा स्फोट या दोन्ही घटना निवडणुकीपूर्वी शांतता बिघडवण्याचा कट होता," असे वक्तव्य केजरीवालांनी केले. काही लोक हे जाणूनबुजून करत आहेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा कृत्यांना सत्यात उतरुन देऊ नका, असे आवहनही त्यांनी या वेळी केले.

<div class="paragraphs"><p>CM&nbsp;Arvind Kejriwal</p></div>
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा

ज्या व्यक्तीने गुरु ग्रंथ साहिबची विटंबना करण्याचा प्रयत्न केला त्याला कोणाच्या तरी हातून परत पाठवता आले असते. पंजाब सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री केजरीवाल (CM Arvind Kejriwal) म्हणाले की, राज्य सरकार (State Government) प्रामाणिक, वचनबद्ध नसेल तर अशा घटना पुन्हा घडतील. आप पंजाबमध्ये (Punjab) मजबूत सरकार देईल आणि अशा गुन्ह्यातील सूत्रधारांना शिक्षा देईल. चन्नी सरकार अत्यंत कमकुवत सरकार आहे. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. आज पंजाबला मजबूत आणि कृतीशील सरकारची गरज आहे.

काल ट्विट करून केजरीवाल यांनी लिहिले की, आधी अपवित्र, आता धमाका. काही लोकांना पंजाबची शांतता बिघडवायची आहे. पंजाबचे 3 कोटी जनता त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत. एकमेकांचा हात धरावा लागतो. ही बातमी ऐकून दु:ख झाले, मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि सर्व जखम लवकरात लवकर बरे होवोत अशी माझी इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com