''काश्मीर हे गाझा नाही...''; JNU स्टुडंट लिडर शेहला रशीदने PM मोदी अन् अमित शाह यांना दिले क्रेडिट

JNU EX Student Leader Shehla Rashid: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची (जेएनयू) माजी स्टुडंट लिडर शेहला रशीदने मोठे वक्तव्य केले आहे.
 JNU EX Student Leader Shehla Rashid
JNU EX Student Leader Shehla RashidDainik Gomantak
Published on
Updated on

JNU EX Student Leader Shehla Rashid: इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. यादरम्यान जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची (जेएनयू) माजी स्टुडंट लिडर शेहला रशीदने मोठे वक्तव्य केले आहे.

शेहला म्हणाली की, 'खरचं काश्मीर हे गाझा नाही... आज मला काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना द्यायचे आहे.' एएनआयशी बोलताना शेहलाला विचारण्यात आले की, ती काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांबाबत मवाळ आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना तिने ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, शेहला रशीदने जम्मू-काश्मीरमधील बदलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या धोरणांचे कौतुक केले. शेहला म्हणाली की, "काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीसाठी, सध्याच्या सरकारने रक्तहीन राजकीय परिस्थिती निर्माण केली आहे. या सर्व गोष्टींसाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे आणि यासाठी मी सध्याच्या सरकारला संपूर्ण श्रेय देऊ इच्छिते, विशेषत: पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना.''

 JNU EX Student Leader Shehla Rashid
JNU Campus मध्ये थरारनाट्य! कारमधून प्रवेश, विद्यार्थिनींचा विनयभंग आणि नंतर अपहरणाचा प्रयत्न...

एएनआयशी बोलताना शेहलाला विचारण्यात आले की, ती काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांबाबत मवाळ आहे का? उत्तरात ती म्हणाली की ''हो, 2010 पर्यंत माझी भूमिका होती. पण आज जेव्हा मी ते पाहते तेव्हा मी सध्याच्या सरकारची खूप आभारी आहे.

काश्मीर हे गाझा नाही कारण, काश्मीर केवळ निषेध, बंडखोरी आणि घुसखोरीच्या तुरळक घटनांचे साक्षीदार होते. पण, आज तसे नाही, याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जाते.''

दुसरीकडे, शेहलाने जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तत्पूर्वी, यावर्षी ऑगस्टमध्ये, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका करणाऱ्या शेहलाने जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

खोऱ्यातील मानवी हक्कांची स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शेहलाने मोदी सरकारसोबतच (Government) जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचेही आभार मानले होते.

 JNU EX Student Leader Shehla Rashid
JNU-DU नंतर FTII मध्ये विद्यार्थी संघटनेने दाखवली 'इंडिया: द मोदी क्वेशन' डॉक्युमेंट्री

एएनआयशी बोलताना शेहलाने जवाहरलाल नेहरु विद्यापीठाशी संबंधित वादांवरही तोंडसुख घेतले. ईशान्य दिल्ली दंगलीच्या संदर्भात उमर खालिद आणि तत्कालीन जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली कधी अटक करण्यात आली होती याबद्दलही ती स्पष्टपणे बोलली.

शेहला म्हणाली की, "हे फक्त आम्हा तिघांचे आयुष्यच बदलून टाकणारे नव्हते, संपूर्ण विद्यापीठाला त्या घटनेचे परिणाम भोगावे लागले, कारण जेएनयूशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या."

शेवटी शेहला म्हणाली की, "जेएनयूमध्ये 'भारत तेरे टुकडे होंगे', 'लाल सलाम' सारखे नारे कधीच लावले गेले नाहीत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com