Karun Nair: लहान मुलासारखा रडला करुण नायर, केएल राहुलने दिला आधार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल; नेमकं काय झालं?

Karun Nair Crying Photo: सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करुण नायर ढसाढसा रडताना दिसत आहे.
Karun Nair Crying Photo
Karun Nair Crying PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

Karun Nair Crying Photo: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग-11 मध्ये तीन मोठे बदल केले. यामध्ये, सलग 6 डावांमध्ये अपयशी ठरलेल्या करुण नायरला (Karun Nair) संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. करुणच्या जागी साई सुदर्शनला (Sai Sudarshan) प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली.

दरम्यान, सोशल मीडियावर (Social Midea) एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करुण नायर ढसाढसा रडताना दिसत आहे, तर केएल राहुल (KL Rahul) त्याला सावरताना आणि समजावताना दिसत आहे. करुणची ही अवस्था पाहून क्रिकेटप्रेमीही भावूक झाले.

करुण नायर भावूक का झाला?

जवळपास 8 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात (Indian Test Team) पुनरागमन केलेल्या करुण नायरकडून इंग्लंड दौऱ्यावर चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळाल्यानंतरही त्याला फलंदाजीने काही खास कमाल करता आली नाही.

Karun Nair Crying Photo
IND vs ENG 4th Test: टीम इंडियाला धक्का! ऋषभ पंतला दुखापत, अ‍ॅम्ब्युलन्समधून नेलं...कसोटी मालिकेतून पडणार बाहेर?

करुणने अनेक डावांमध्ये चांगली सुरुवात केली, पण त्याला ती मोठ्या खेळीत बदलता आली नाही. 6 डावांमध्ये करुणच्या बॅटमधून फक्त 131 धावा निघाल्या आणि 40 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती. करुण प्रत्येक वेळी चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याच्या बॅटमधून काही चांगले फटकेही निघाले, पण तो प्रत्येक वेळी आपली विकेट फेकून बाद होत होता. याच कारणामुळे त्याला चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले.

व्हायरल झालेला हृदयस्पर्शी फोटो

संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर करुण मैदानावरच भावूक झाल्याचा दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये तो अक्षरशः लहान मुलासारखा रडताना दिसत आहे. त्याचवेळी, केएल राहुल (KL Rahul) त्याला धीर देताना आणि समजावताना दिसत आहे. करुणची ही अवस्था पाहून क्रिकेटप्रेमीही खूप भावूक झाले आहेत. काही क्रिकेटप्रेमींचे म्हणणे आहे की, करुण कदाचित निवृत्ती घेण्याचा विचार करत असावा.

Karun Nair Crying Photo
IND vs ENG: भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे आणि टी20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर, आठ सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

8 वर्षांनंतर झाले होते पुनरागमन

करुण नायरने 2017 मध्ये तिहेरी शतक (Triple Century) झळकावले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) सातत्याने दमदार कामगिरीच्या जोरावर करुण 8 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी झाला. हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली. पहिल्या डावात तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून 20 धावा निघाल्या.

Karun Nair Crying Photo
IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

एजबॅस्टनमध्ये संघ व्यवस्थापनाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली, पण तरीही तो काही खास कमाल करु शकला नाही. लॉर्ड्समध्ये करुणने पहिल्या डावात 40 धावा केल्या, पण दुसऱ्या डावात तो फक्त 14 धावाच करु शकला. दरम्यान, या घटनेने करुण नायरच्या कारकिर्दीतील अनिश्चितता आणि खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com