Karnataka:'एक हजार मोदी आले तरी...' कुमारस्वामींचा 'योगी मॉडेल' वर हल्लाबोल

HD Kumaraswamy: वाढत्या हत्यांमुळे कर्नाटकातील वातावरण चांगलेच तापले आहे.
HD Kumaraswamy
HD KumaraswamyDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka News: वाढत्या हत्यांमुळे कर्नाटकातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 'योगी मॉडेल' ची प्रशंसा केली. यावरुन जनता दल (Secular) ने निशाणा साधला आहे. अशा घटना राज्यात अधिक वाढल्यास भाजपला राज्यातून उखडून फेकले जाईल, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेतरु यांची हत्या झाली आहे.

दरम्यान, कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी भाजपला राज्यासाठी 'आपत्ती' म्हटले आहे. कुमारस्वामी म्हणाले, 'कर्नाटकात हजार मोदी आले तरी त्यांची निती चालणार नाही'. त्यांनी उत्तर प्रदेशशी संबंधित बुलडोझरच्या वृत्ताचा संदर्भ देत सरकारवर (Government) निशाणा साधला. जर त्यांनी ती संस्कृती कर्नाटकात (Karnataka) आणली तर भाजपला राज्यातून उखडून टाकले जाईल, असे ते म्हणाले.

HD Kumaraswamy
Kerala HC चा मोठा निर्णय, Social Media वरील अपमानास्पद वक्तव्यावर SC/ST कायदा लागू होणार

काय आहे 'योगी मॉडेल'चे प्रकरण?

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, 'राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार "योगी मॉडेल" चा स्वीकार करु शकते.' बोम्मई यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. यावेळी त्यांनी आपल्या सरकारला शंभरपैकी शंभर गुण दिले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) परिस्थिती पाहता योगी आदित्यनाथ योग्य मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात अशी परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या सर्वांचा वापर केला जात आहे. परिस्थितीनुसार योगी मॉडेलचा कर्नाटकातही स्वीकार केला जाऊ शकतो.''

HD Kumaraswamy
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाल्यासच SC-ST कायदा लागू होईल: कर्नाटक उच्च न्यायालय

शिवाय, दक्षिण कन्नड जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्याच्या हत्येनंतर, कर्नाटकात 'योगी मॉडेल' लागू करण्याची मागणी भाजप आणि संघ परिवारातील काही सदस्यांनी केली. बोम्मई या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com