Karnataka High Court: सेक्स करण्यास नकार दिल्याने पतीविरुद्ध FIR, हायकोर्ट म्हणाले, 'क्रूरता, पण गुन्हा नाही…'

Karnataka High Court: कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने पती आणि सासू-सासऱ्याविरोधात खटला दाखल केला होता.
Karnataka High Court
Karnataka High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka High Court: कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने पती आणि सासू-सासऱ्याविरोधात खटला दाखल केला होता. पतीने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा आरोप पत्नीने यामध्ये केला होता.

ती 1 महिना पतीसोबत राहिली पण तो तिच्यावर प्रेम करत नव्हता, तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवले नाही. याला गुन्हा ठरवत महिलेने खटला दाखल केला होता. न्यायालयाने सुनावणी करताना पतीने पत्नीशी शारीरिक संबंध न ठेवणे हे क्रूरता ठरु शकते पण गुन्हा नाही, असे म्हटले.

न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, 'प्रेम म्हणजे केवळ सेक्स नाही. ते दोन आत्म्याचे मिलन आहे.' न्यायालयाने पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध आयपीसीच्या कलमांखाली दाखल केलेला खटला रद्द केला.

न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पतीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करताना सांगितले की, हिंदू विवाह कायदा-1955 अन्वये जर पतीने पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर तो क्रूरपणा आहे, परंतु IPC कलम 489अ अन्वये अंतर्गत येत नाही.

'पतीने कधीच सेक्स केला नाही'

माहितीनुसार, महिलेने पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध आयपीसीच्या कलम 498A आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये महिलेने सांगितले की, तिचा नवरा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही. त्यानंतर, कलम 498अ अन्वये कारवाई करण्यात आली. तपासाअंती पोलिसांनी (Police) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कनिष्ठ न्यायालयाने ते मान्य केले.

Karnataka High Court
Karnataka High Court: नवऱ्यावर बलात्काराचा आरोप, कर्नाटक HC म्हणाले, 'कायद्याच्या दुरुपयोगाचे यापेक्षा चांगले उदाहरण...'

या आरोपाला उच्च न्यायालयात आव्हान दिले

कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला पतीने कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) आव्हान दिले. खंडपीठाने नमूद केले की, याचिकाकर्त्यावर एकच आरोप आहे की त्याने आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. पत्नीच्या माहेरुन हुंडा मिळत नसल्याने तो हे करायचा.

'प्रेमाचा अर्थ सेक्स नाही'

प्रेमाचा अर्थ कधीही शारीरिक संबंध नसावा, तर ते आत्म्याचे मिलन असावे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. खंडपीठाने सांगितले की, पतीचा पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा कधीही हेतू नव्हता. विवाह पूर्ण न करणे हे हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12(1)(अ) अंतर्गत क्रूरता म्हणून येते. परंतु, ते IPC कलम 498A अंतर्गत येत नाही.

Karnataka High Court
Karnataka High Court: मुलीची ताबा वडिलांकडे दिला नाही; कोर्टाने दिला महिलेचे वेतन रोखण्याचा आदेश...

28 दिवस पत्नी त्याच्यासोबत राहिली

खंडपीठाने म्हटले की, पतीविरुद्ध फौजदारी कारवाई सुरु करता येणार नाही, कारण तो कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग असेल. मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर 2019 रोजी दोघांचे लग्न झाले होते आणि तक्रारदार पत्नी केवळ 28 दिवस पतीच्या घरी राहिली होती.

पत्नीने 5 फेब्रुवारी 2020 रोजी आयपीसी कलम 498A अन्वये पोलिस तक्रार दाखल केली होती, जी हुंडाबळी छळाशी संबंधित आहे.

तिने कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12(1)(अ) अन्वये तक्रारही दाखल केली होती, ज्यामध्ये दावा केला होता की, लग्नानंतर पतीने आपल्याशी लैंगिक संबंध ठेवले नाही. पत्नीने पती आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com