Karnataka Crime: कर्नाटकात धक्कादायक घटना, दिवाळीत एकाच घरात सापडले 4 मृतदेह

Karnataka Crime: संपूर्ण देश आज दिवाळीच्या उत्सवात मग्न आहे. त्याचवेळी कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Crime: संपूर्ण देश आज दिवाळीच्या उत्सवात मग्न आहे. त्याचवेळी कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील तृप्ती नगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले आहेत. कुटुंबातील तीन मुले आणि आईचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुखवटा घातलेल्या व्यक्तीने जबरदस्तीने घरात घुसून हसीना आणि त्यांच्या तीन मुलांवर क्रूरपणे हल्ला केला. मृत महिलेचा पती आखाती देशात काम करतो असे सांगण्यात येत आहे.

घरातून सोने आणि रोकड रक्कम चोरीला गेली नाही

उडपी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरुण कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. हत्येमागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असे त्यांनी सांगितले. उडुपीचे एसपी म्हणाले की, अज्ञात व्यक्तीने येऊन आई आणि तीन मुलांची हत्या केली.

पोलीस (Police) या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. घरातून सोने किंवा रोख रक्कम चोरीला गेली नाही. याप्रकरणी मालपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई आणि तीन मुलांची हत्या

उडुपी पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये तीन मुले आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. 48 वर्षीय हसीना, 23 वर्षीय अफनान, 21 वर्षीय अयनाज आणि 14 वर्षीय असीम अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्रीय तरुणाच्या हत्येतील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

दुसरीकडे, महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यात वैयक्तिक वादातून 19 वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. क्राइम युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी सांगितले की, 8 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील भिवंडी परिसरातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर पोलिसांनी कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला होता.

भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला होता. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणासह तांत्रिक आणि गुप्तचर माहितीच्या आधारे पीडितेची ओळख पटली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com