Karnataka Road Accident: कर्नाटकात भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

Karnataka Road Accident: कर्नाटकातील चिक्कबल्लापूरच्या हद्दीत झालेल्या एका रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
Karnataka Road Accident
Karnataka Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Road Accident: कर्नाटकातील चिक्कबल्लापूरच्या हद्दीत झालेल्या एका रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला एसयूव्हीने धडक दिल्याने हा अपघात झाला, ज्यात 13 जण गंभीर जखमी झाले.

जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 9 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात (Accident) राष्ट्रीय महामार्ग 44 वर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चिक्कबल्लापूरा पोलीस ठाण्यासमोर घडला.

वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे टाटा सुमो चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला टँकर दिसला नाही आणि तो धडकला. मिळालेल्या माहितीनुसार, एसयूव्ही बागेपल्लीहून चिक्कबल्लापूरकडे जात होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Karnataka Road Accident
Karnataka Bus Accident At Goa: चालकाच्या डुलकीने झाला अपघात, आगशी वळणावर बस कलंडली

राष्ट्रीय महामार्ग-44 वर हा अपघात झाला

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, हा अपघात सकाळी सातच्या सुमारास चिक्कबल्लापूर शहराच्या जिल्हा मुख्यालयाच्या हद्दीत घडला.

एसयूव्ही आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनंतपूरहून बंगळुरुला जात असताना अचानक चालकाने राष्ट्रीय महामार्ग-44 वर उभ्या असलेल्या टँकरला धडक दिली, परिणामी चार महिलांसह 13 प्रवाशांचा मृत्यू झाला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात ठार झालेले हे अनंतपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतांमध्ये कार चालकाचाही समावेश आहे.

Karnataka Road Accident
Karnataka Accident: भीषण अपघातात कारमधील 10 जणांचा मृत्यू, केवळ एक बचावला

मृतांची ओळख पटवली जात आहे

दरम्यान, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक (चिक्कबल्लापूर) डीएल नागेश यांनी माध्यमांना दिली. सर्व लोक कारमधून अनंतपूरहून बंगळुरुला जात होते आणि वाटेत त्यांची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडकली.

पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी पुढे माहिती दिली की, मृत अनंतपूर येथील गोरंटला येथील रहिवासी असून ते एका कुटुंबातील नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com