Kanpur Accident Updates: कानपूरमध्ये शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रितपणे उलटली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीएम योगींनी या अपघाताची दखल घेतली
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, कानपूरमधील कोर्टा येथील काही लोक उन्नावमधील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सर्व भाविक ट्रॅक्टर-ट्रॉलीने दर्शन घेऊन परतत होते. वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूर (Kanpur) दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, कानपूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये पीएम रिलीफ फंडातून देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, घाटमपूरच्या साध आणि गंभीरपूर गावादरम्यान शनिवारी हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 35 ते 40 जणांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. माहिती मिळेपर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपी कानपूर आऊटरसह सहा पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित आहे. याशिवाय प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.