उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Former Uttar Pradesh CM and former Rajasthan Governor Kalyan Singh passes away
Former Uttar Pradesh CM and former Rajasthan Governor Kalyan Singh passes awayDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) येथे सेप्सिस आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले.

कल्याण सिंह यांची तब्येत जवळजवळ दोन महिन्यांपासून प्रकृती स्थिर नव्हती. त्यांना एसजीपीजीआय, लखनऊ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

89 वर्षीय कल्याण सिंह यांची प्रकृती पाहता सीएम योगींनी त्यांचा गोरखपूर दौरा आज रद्द केला करुन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात देखील गेले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असण्याव्यतिरिक्त कल्याण सिंह राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच भाजपचे मंत्री, खासदार आणि एकुणच सर्व राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

कल्याण सिंह यांना 4 जुलै रोजी गंभीर अवस्थेत संजय गांधी पीजीआयच्या क्रिटिकल केअर मेडिसिनच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रदीर्घ आजार आणि शरीराच्या अनेक अवयवांनी हालचाल बंद केल्यानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com