न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश (Chief Justice Of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घटनेच्या अधिकारानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ही नियुक्ती केली आहे. देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.
देशाचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. किरेन रिजिजू यांनी डीवाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
संक्षिप्त प्रवास
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.
वडीलही होते सरन्यायाधीश
विशेष म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश (1978 ते 1985 ) आहेत. सर्वाधिक काळ CJI राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूडच्या नावावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.