Chhattisgarh High Court: न्यायाधीश आणि वकिलांवर नेटकऱ्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर छत्तीसगड उच्च न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. न्यायाधीशांना बोलणे ही काही लोकांची सवयच बनली आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले. छत्तीसगड उच्च न्यायालयाने अलीकडेच खटल्यांच्या लाइव्ह-स्ट्रीमिंगद्वारे न्यायालयीन कामकाजात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की, न्यायाधीशांना बोलणे काही लोकांची सवयच बनली आहे. न्यायालयाविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या खंडपीठाने म्हटले की, कोणतीही भीती आणि पक्षपात न करता न्याय देण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था सर्वोपरि आहे. न्यायाधीश आणि वकिलांबद्दल अपमानास्पद भाषेत बोलणे काही लोकांची सवय बनली आहे. अशाप्रकारची वक्तव्ये न्यायालयांच्या अधिकाराची बदनामी करतात. लोकशाही व्यवस्थेत अशाप्रकारची वक्तव्ये कदापि खपवून घेतली जाणार नाहीत. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, न्यायालयावर न्याय्य आणि संतुलित टीका केली असेल तर कारवाई होऊ शकत नाही. मात्र, अपशब्द वापरणे आणि न्यायालयीन कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा न्यायालयाने दिला.
दरम्यान, छत्तीसगड उच्च न्यायालयाने बाल कस्टडी प्रकरणावर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर या कारवाईचे लाइव्ह-स्ट्रीमिंग करण्यात आले. यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.