

Joshimath Helicopter Crash Uttarakhand: उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धामजवळ मोठी दुर्घटना घडली. जोशीमठ परिसरातील चाई आणि थॅंग गावाच्या वर उडत असलेले एक हेलिकॉप्टर अचानक कोसळून झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर 'ट्राान्स भारत' कंपनीचे होते. बद्रीनाथ धाम येथून 6 प्रवाशांना घेऊन हे हेलिकॉप्टर ऋषिकेशच्या दिशेने जात असताना हा मोठा अपघात (Accident) घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकाशिवाय इतर पाच प्रवासी प्रवास करत होते. मृतांमध्ये पायलट हिमांशु यांच्यासह चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व या प्रवाशांचा समावेश आहे. अपघाताची माहिती भारतीय सैन्याने स्थानिक प्रशासनाला दिली, त्यानंतर चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी लोकेशन ट्रेस करुन हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या आणि सर्व 6 जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफच्या तुकड्यांनी संयुक्तपणे तातडीने मदत व बचाव कार्य सुरु केले. या भीषण दुर्घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत प्रशासनाला मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले असून स्वतः या संपूर्ण मदतकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण उत्तराखंड आणि बद्रीनाथ यात्रेकरुंमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.