देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना अनेक राज्यं लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याची तक्रारही करत आहेत. कोरोना लसीकरणावरुन अनेक राज्ये आमने सामने आले असून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाल (Adar Punawala) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. युरोप आणि अमेरिकेने पुरवठा थांबवला असल्याचंही सांगितलं होतं. अद्यापही अमेरिकेकडून कोरोना लसीसाठी लागणारा कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे पुनावाला यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी हात जोडून विनंती केली आहे.
‘’अमेरिका आणि युरोपातुन लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे’’. असं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. दरम्यान आता त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे. (Joe Biden joining hands with Adar Punawalas request Said tweeting)
अदर पुनावाला ट्विटमध्ये म्हणतात की, ‘’आदरणीय जो बायडन जर आपण कोरोनाविरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे कोरोनाची लस बनवण्यासाठी वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याबद्दल सविस्तर माहिती आहे.’’
अदर पुनावाला यांनी यापूर्वी देखील कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. माध्यमांशी बोलताना, कच्चा माल मिळवण्यासाठी शक्य असतं तर मीच अमेरिकेमध्ये जाऊन आंदोलन केलं असतं, असं म्हटलं होतं.
‘’मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्र घेतला असता. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल अडवून धरला आहे. भारतातीलच नाही तर, जगभरात कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनाही या कच्च्या मालाची आवश्यकता आहे,’’ असं अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.
‘’आम्हाला कोरोना लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल सध्या हवा आहे. वर्षभरानंतर या कच्च्या मालाची आम्हाला आवश्यकता नसेल. कारण त्यांनतर आम्ही नवीन पुरवठादाराकडून कच्चा माल मिळवण्याची सोय केलेली असेल. परंतु आता आम्हाला आमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची अत्यंत आवश्यकता आहे.’’ असं अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.