पास होण्याचा अजब फॉर्म्युला! प्रोफेसर म्हणाले, '2 हजार दो सर्टिफिकेट लो...'

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील पूर्वांचल विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Professor
ProfessorDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील पूर्वांचल विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असिस्टंट प्रोफेसर पैसे घेताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना पास करुन देण्याच्या नावाखाली प्राध्यापकाने पैसे घेतल्याचा आरोप होत आहे. प्राध्यापकाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकाला तात्काळ परीक्षेशी संबंधित कामापासून वेगळे केले असून त्यांना नोटीस देऊन 3 दिवसांत उत्तर मागितले आहे.

दरम्यान, पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापकाचे नाव डॉक्टर विनय वर्मा असून ते कंत्राटी आहेत. सेमिस्टर परीक्षा आयोजित करण्यासाठी डॉ. विनय वर्मा यांना केंद्रप्रमुख करण्यात आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर विनय वर्मा यांना तातडीने पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी डॉ. श्याम कन्हैया यांच्याकडे नवीन केंद्रप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Professor
Uttar Pradesh Crime: विवस्त्र करुन तरुणाला बेदम मारहाण, तो विनवणी करत राहिला...

प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप

ही बाब वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठाची आहे. सध्या येथे सेमिस्टरच्या परीक्षा सुरु आहेत. दरम्यान, केंद्र प्रमुख सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनय वर्मा यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामुळे संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाची बदनामी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्राध्यापक काही विद्यार्थ्यांशी बोलताना दिसत आहेत आणि पैसे घेतानाही दिसत आहेत. आता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पैसे देऊन फसवणूक केली

व्हिडीओमध्ये सहाय्यक प्राध्यापक परीक्षेतील कॉपी हरवली तरी काम होईल, पण दोन हजार रुपये लागतील, असे म्हणताना दिसले. एवढेच नव्हे तर फसवणूक करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांना पास होण्याचे सूत्रही केंद्रप्रमुखांनी सांगितले. मोबाईलवरुन कॉपी करताना पकडलेल्या मुलांनीही कुणाला काहीही बोलू नये, असे प्राध्यापकांनी सांगितले.

Professor
Uttar Pradesh Crime: माणूस म्हणावे की हैवान! प्रेमविवाह केलेल्या पत्नी आणि आठ महिन्याच्या मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या

विद्यार्थ्याने स्वतः आरोपी प्रोफेसरचा व्हिडिओ बनवला

सहाय्यक प्राध्यापक विद्यार्थ्यांशी बोलत असताना त्यांना उत्तीर्ण होण्याचा फॉर्म्युला सांगत असताना एका विद्यार्थ्याने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर अपलोड करुन व्हायरल केला. हळूहळू तोच व्हिडिओ व्हायरल झाला.

कुलगुरुंनी चौकशीच्या सूचना दिल्या

हा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण प्रकरण विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचले. प्रशासनाने नोटीस बजावून डॉ. विनय वर्मा यांच्याकडून 3 दिवसांत उत्तर मागितले आहे. कुलगुरु डॉ.वंदना सिंह यांनी चौकशी समिती गठीत करुन करार रद्द करुन तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com