Jasprit Bumrah: 50व्या कसोटीत बुमराहचा 'किलर' यॉर्कर! विंडीजचा फलंदाज हतबल, स्टंप्स आऊट ऑफ द पार्क Watch Video

IND vs WI 2nd Test: भारताने आपला पहिला डाव 518 धावांवर घोषित केला होता, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
Jasprit Bumrah Video
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

Jasprit Bumrah Video: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी करत विंडीजचा पहिला डाव 248 धावांवर संपुष्टात आणला. या कामगिरीमुळे भारताला पहिल्या डावात 270 धावांची मोठी आणि महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. भारताने आपला पहिला डाव 518 धावांवर घोषित केला होता, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

बुमराहच्या 'स्टंप उडवणाऱ्या' यॉर्करची चर्चा

तिसऱ्या दिवशी जेवणानंतर (Lunch Break) पहिली ओव्हर टाकण्यासाठी मैदानात उतरलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कमाल केली. आपल्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना खेळत असलेल्या बुमराहने या ओव्हरमध्येच खैरी पियरेला (Khairy Pierre) तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने टाकलेला चेंडू इतका शानदार होता की, पियरे पूर्णपणे चितपट झाला. पियरेला तो चेंडू केवळ बचावात्मक खेळायचा होता, पण बुमराहचा तो 'जादुई' यॉर्कर (Yorker) थेट स्टंप्सवर आदळला. चेंडू लागताच स्टंप हवेत कलाबाजी करत दूरवर जाऊन पडली, जो बुमराहच्या भेदक गोलंदाजीची साक्ष देतो.

Jasprit Bumrah Video
IND vs WI 2nd Test: बाय-लेगबायशिवाय उभारला 518 धावांचा डोंगर! भारतानं मोडला बांगलादेशचा वर्ल्ड रेकॉर्ड; टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास VIDEO

जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले होते आणि 50 सामन्यांत त्याने आतापर्यंत एकूण 223 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याची यॉर्कर ही त्याची सर्वात मोठी ताकद मानली जाते.

Jasprit Bumrah Video
IND vs WI 2nd Test: 23 वर्षांनी पुन्हा तोच 'इतिहास'! शतक हुकले तरी साई सुदर्शनने केला मोठा कारनामा; दिल्लीत पुन्हा डावखुऱ्या फलंदाजाचा दबदबा VIDEO

कुलदीप यादवचे पाच बळी

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या डावात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो कुलदीप यादव (Kuldeep Yadav). कुलदीपने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा कणा मोडत पाच विकेट्स मिळवले आणि आपल्या फिरकीची जादू दाखवली. कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजचा संघ मोठ्या धावसंख्येकडे जाऊ शकला नाही. कुलदीपशिवाय, रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

Jasprit Bumrah Video
IND vs WI 2nd Test: शुभमन गिल दिल्लीत रचणार 'महाकीर्तिमान'? डॉन ब्रॅडमन नंतर अशी कामगिरी करणारा ठरणार दुसरा कर्णधार

वेस्ट इंडीजकडून एलिक एनाथाजे (Alick Athanaze) याने सर्वाधिक 41 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या या सांघिक प्रदर्शनामुळे वेस्ट इंडीजचा डाव 248 धावांवर संपुष्टात आला आणि भारताला 270 धावांची मोठी आघाडी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com