जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu- Kashmir) दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) तीन नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिस दलाला लक्ष्य करत ग्रेनेड फेकला (Grenade Attack) पण तो चुकला आणि तिथे उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये ग्रेनेड पडला आणि स्फोट झाला. ही घटना पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा पोलिसांचे पथक कुठेतरी जात असल्याचे सांगितले जात आहे.(Jammu-Kashmir: Terrorist hurl grenade on Police party at Pulwama)
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. हल्ल्यातील पोलीस वाहन थोडक्यात बचावले असून ग्रेनेड फेकल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेनंतर परिसराला घेराव घालण्यात आला असून पोलीस कर्मचारी परिसराला घेरून दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम राबवत आहेत.
अलिकडच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ले वाढले आहेत. गेल्या आठवड्यात शहरातील चानापोरा भागात ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन महिलांसह तीन जण जखमी झाले होते. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग 44 च्या व्यस्त परिपिरा-पानठाचौक रस्त्यावर दहशतवाद्यांनी ठेवलेले सहा ग्रेनेड निष्प्रभावी केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.