Breaking News: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला

जम्मू -काश्मीरच्या (Jammu-Kashmir) श्रीनगरमध्ये (Srinagar) रविवारी दहशतवाद्यांनी (Terrorist Attack)एका पोलीस तुकडीवर हल्ला केला आहे
Jammu-Kashmir: Terrorist Attack on police party at kKhanyar near Srinagar
Jammu-Kashmir: Terrorist Attack on police party at kKhanyar near SrinagarDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू -काश्मीरच्या (Jammu-Kashmir) श्रीनगरमध्ये (Srinagar) रविवारी दहशतवाद्यांनी (Terrorist Attack)एका पोलीस तुकडीवर हल्ला केला आहे . जुन्या श्रीनगरच्या खानयार (Khanyar)भागात झालेल्या या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला अनेक गोळ्या लागल्या आहेत, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Jammu-Kashmir: Terrorist Attack on police party at kKhanyar near Srinagar)

सुरुवातीच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलीस पार्टीला लक्ष्य केले. हल्ल्यानंतर लगेचच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली आहे.

जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे . कधी ते स्थानिक नेत्यांना लक्ष्य करतात आणि ठार करतात तर कधी लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात. तर दुसरीकडे भारतीय सैनिकही सैनिकही पूर्ण तयारीने दहशतवाद्यांशी सामना करत आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटी, देशाच्या गुप्तचर संस्थांनी देशात 15 दिवसांच्या आत आतंकवादी हल्ल्यांचे 10 पेक्षा जास्त अलर्ट जारी केले होते. सर्व अलर्टमध्ये पीओकेच्या माध्यमातून जम्मू -काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती.

Jammu-Kashmir: Terrorist Attack on police party at kKhanyar near Srinagar
AAP ची धुरा पुन्हा अरविंद केजरीवालांकडेच

तर दुसरीकडे जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराचे जवानही दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी वारंवार कारवाया करत आहेत . गेल्या महिन्याच्या अखेरीस सोपोरमध्ये लष्कराला मोठे यश मिळाले होतगे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com