काश्मीर मुद्द्यावरून दिल्लीत हालचाली वाढल्या

या बैठकीत सुरक्षा, जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) आणि सीमापार दहशतवादावर चर्चा होत आहे.
Jammu-Kashmir Issue Amit shah meet Prime Minister Narendra Modi
Jammu-Kashmir Issue Amit shah meet Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली आहे तत्पूर्वी काल अमित शहांनी राज्य पोलीस प्रमुख (State Police Chief) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली होती. आणि या बैठकीनंतर अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे . मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सुरक्षा, जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) आणि सीमापार दहशतवादावर चर्चा होत आहे.(Jammu-Kashmir Issue Amit shah meet Prime Minister Narendra Modi)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पंतप्रधान मोदींसह देशभरातील पोलीस प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही बैठक होत आहे. अमित शहा यांनी सोमवारी राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांसह विविध सुरक्षा-संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली होती. यावर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, "शहा यांनी येथे गुप्तचर ब्युरो (IB) मुख्यालयात 'राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदे'च्या समारोप सत्राचे अध्यक्षपद भूषवले आणि यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. "

सोमवारी झालेल्या या बैठकीला सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे डीजीपी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत अंतर्गत सुरक्षेच्या विविध आव्हानांवर चर्चा करण्यात आली आहे तसेच त्या समस्यांना सामोरे जाण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली आहे . अधिकृत सूत्रांनी सांगितले की, बैठकीत देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून ज्यात देशातील एकूण सुरक्षा परिस्थिती आणि अलीकडील काश्मीरमधील नागरिकांना लक्ष्य करण्याच्या हत्यांच्या घटनांचा समावेश आहे.

Jammu-Kashmir Issue Amit shah meet Prime Minister Narendra Modi
जम्मू-काश्मीरमध्ये 'अच्छे दिन', दुबईस्थित कंपनी करणार मोठी गुंतवणूक

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 ऑक्टोबर रोजी जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत . गृहमंत्र्यांची ही रॅली संविधानाच्या कलम 370 हटवल्यानंतरची पहिली रॅली असेल. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटना आणि बाहेरील लोकांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये अमित शहा यांची रॅली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजपच्या जम्मू -काश्मीर युनिटचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी रॅलीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की केंद्रीय गृहमंत्री 24 ऑक्टोबर रोजी जम्मूमध्ये एका विशाल रॅलीला संबोधित करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com