जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, 4 दहशतवाद्यांना अटक

दहशतवाद्यांकडून 4 पिस्तुलांसह अनेक शस्त्रे जप्त
jammu and kashmir 4 lashkar terrorists arrested from bemina srinagar
jammu and kashmir 4 lashkar terrorists arrested from bemina srinagarDanik Gomantak
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी श्रीनगरच्या बेमिना येथून लष्कराच्या 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. दहशतवाद्यांकडून 4 पिस्तुलांसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी श्रीनगरमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. (jammu and kashmir 4 lashkar terrorists arrested from bemina srinagar)

याआधी शुक्रवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाचा संकरित दहशतवादी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. आशिक हुसेन लोन रहिवासी हैदर मोहल्ला, उष्कारा, बारामुल्ला असे अटक केलेल्या दहशतवाद्यांचे नाव आहे. दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उझैर अमीन गनी रा. कांठबाग, बारामुल्ला असे आहे.

jammu and kashmir 4 lashkar terrorists arrested from bemina srinagar
भारतात या ट्रेनने लोक 73 वर्षांपासून करतायत मोफत प्रवास, कारण...

दहशतवाद्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे

या महिन्यात सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक केली. यातील एक दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा होता. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून म्हटले होते की, 'कुलगाम पोलीस आणि लष्कराने (34राष्ट्रीय रायफल्स) यामीन युसूफ भट, प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संकरित दहशतवादी, जो गदिहामा कुलगामचा रहिवासी आहे, याला अटक केली आहे.' पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, पिस्तूल, दोन ग्रेनेड आणि 51 पिस्तुल काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांची संख्या सतत वाढत आहे

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हायब्रीड दहशतवादी राजकीय कार्यकर्ते, नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांना लक्ष्य करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com