Jabalpur Hospital Fire: जबलपूर येथील एका खासगी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचार्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेची पुष्टी करताना जबलपूरचे (Jabalpur) एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले की, 'गंभीर भाजल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यासह तीन जण गंभीर भाजले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यासोबतच आणखी अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.'
दुसरीकडे, गोहलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चांडाल भाटा परिसरातील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी अचानक आग लागली. हॉस्पिटलमधून (Hospital) बाहेर पडण्याचा एकच मार्ग असल्याने बहुतांश लोक आत अडकले. अग्निशमन दलाला सुरुवातीला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. नंतर इलेक्ट्रीसिटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कट केल्याने तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
गेल्या वर्षी कमला नेहरु रुग्णालयात आग लागली होती
2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात भोपाळमधील (Bhopal) कमला नेहरु हॉस्पिटलच्या मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली होती. या भीषण आगीत चार मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर कमला नेहरु रुग्णालयाच्या संचालकांसह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले. गांधी मेडिकल कॉलेज आणि हमीदिया हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या सरकारी कमला नेहरु हॉस्पिटलच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (SNCU) मध्ये गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8.35 वाजता आग लागली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.