Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

Karnataka ivory bust: खानापूर तालुक्यातील घस्टोळी क्रॉसजवळ हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या (CEN) विशेष पथकाने बुधवारी (३ जुलै) सापळा रचत तिघा संशयितांना अटक केली
Ivory Suggling Khanapur
Ivory Suggling KhanapurDainik Gomantak
Published on
Updated on

खानापूर तालुक्यातील घस्टोळी क्रॉसजवळ हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या (CEN) विशेष पथकाने बुधवारी (३ जुलै) सापळा रचत तिघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सात हस्तिदंताचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही व्यक्ती घस्टोळी क्रॉस परिसरात हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी ही टोळी त्या परिसरात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सात हस्तिदंताचे तुकडे जप्त करण्यात आले.

Ivory Suggling Khanapur
Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

या प्रकरणी संजय शामराव गवळकर (रा. सीतावडा-रामनगर), जाफर बाबू गुंडोळ्ळी (रा. भुरुणकी, ता. खानापूर) आणि बसवराज ऊर्फ अभिषेक रवी वड्डर (रा. भुरुणकी, ता. खानापूर) या तिघांना अटक करण्यात आलीय.

अटकेनंतर तिन्ही संशयितांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

खानापूर तालुका आणि परिसरात वन्यजीवांची शिकार व अवैध तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आलं आहे. आठवडाभरापूर्वी नेरसाजवळील जंगलात प्राण्यांच्या शिकारीप्रकरणी नऊ जणांविरोधात कारवाई करण्यात आली होती.

त्या घटनेचे पडसाद थांबण्याआधीच हस्तिदंत तस्करीचा प्रकार उघड झाल्याने वन विभाग आणि पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.

Ivory Suggling Khanapur
Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

हस्तिदंत किंवा इतर वन्यजीव अवयवांची तस्करी ही केवळ बेकायदेशीर नाही, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही गंभीर समस्या आहे. हत्तींना ठार करून त्यांचे दात काढले जातात, हे क्रौर्य थांबवण्यासाठी पोलिस आणि वन खाते संयुक्तरित्या प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com