Lithium Reserves In India जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडल्याची माहिती भारताच्या खाण मंत्रालयाने दिली. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) ने हे साठे शोधले आहेत.
जीएसआयने दिल्लीच्या उत्तरेस 650 किमी अंतरावर जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात 5.9 दशलक्ष टन लिथियमचा साठा शोधला आहे.
या आधी सन 2021 मध्ये कर्नाटकात 1,600 टन लिथियम धातू सापडल्याचे वृत्त हाती आले होते.
भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम धातूचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत भारताला आतापर्यंत 100 टक्के आयात कराव्या लागणाऱ्या लिथियमचा साठा सापडल्याची बातमी समजताच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी सुगीचे दिवस आल्याची समजूत बऱ्याच जणांमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे.
फक्त लिथियमचा साठा मिळवून लिथियम आयन बॅटरी बनवणे सोपे होणार नाही. लिथियमचे उत्पादन आणि शुद्धीकरण हे काम खूप कठीण काम आहे. कारण ऑस्ट्रेलियात लिथियम 63 लक्ष टन साठा पण उत्पादन 0.6 दशलक्ष टन आहे.
म्हणजेच मिळालेल्या साठ्यातून उत्पादन करणे भारतासाठी सोपे नाही. भारत जर लिथियमचा वापर करण्यात सक्षम झाला तर देशांतर्गत बाजारपेठेत लिथियम-आयन बॅटरीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.
भारताचा विचार केल्यास इलेक्ट्रिक गाड्यांना उच्च प्रतीच्या बॅटरी निर्मितीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल म्हणजेच लिथियम. जो आत्ता आपल्याकडे उपलब्ध झाला असला तरी या कच्च्या मालापासून लिथियमचे उत्पादन आणि शुद्धीकरण हे काम खूप कठीण काम आहे.
तसेच सद्यस्थितीत कार प्रोडक्शनसाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टर चिप्स उपलब्ध नाहीत. इलेक्ट्रिक गाड्यांची दुसरी समस्या म्हणजे यांच्या बॅटरीजचा तयार होणारा ई-कचरा. यावर अजून बरेच संशोधन सुरु आहे.
मात्र 2030 पर्यंत भारतातील 30% खाजगी कार, 70% व्यावसायिक वाहने आणि 80% दुचाकी इलेक्ट्रिक बनवण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. साहजिकच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतात लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.