Odisha Train Accident: 28 मृतदेह अखेर बेवारसच, प्रशासनाने घेतला अंत्यसंस्काराचा निर्णय

AIIMS भुवनेश्वरला पहिल्या टप्प्यात 162 मृतदेह मिळाले होते आणि त्यापैकी 81 मृतदेह मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले होते. नंतर, डीएनए चाचणीनंतर आणखी 53 मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentDainik Gomantak

It has been decided to cremate the 28 bodies left behind in the June 2 triple-train accident at Behnaga station in Odisha's Balasore district:

भुवनेश्वर महानगरपालिकेने (BMC) ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा स्टेशनवर 2 जून रोजी झालेल्या तिहेरी-ट्रेन दुर्घटनेतील 28 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार किंवा मंगळवारपासून तीन दिवस अंत्यसंस्कार केले जातील.

अपघाताची चौकशी करणार्‍या सीबीआयने, सध्या भुवनेश्वरच्या एम्समध्ये ठेवलेल्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी खुर्द जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर खुर्दा प्रशासनाने बीएमसीला अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी पत्र लिहिले.

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक मानल्या गेलेल्या या अपघातात 296 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 1,000 हून अधिक लोक जखमी झाले होते.

"एम्समधून मृतदेह स्मशानभूमीत आणण्याच्या वेळी सीबीआयचे एक पथक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अधिकारी कधी येतील याची आम्हाला माहिती नाही, परंतु अंत्यसंस्कारासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती बीएमसीचे आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी दिली आहे.

Odisha Train Accident
मालमत्ता विकण्यासाठी कुटुंब प्रमुखाला परवानगी गरज असते का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

अंत्यसंस्काराची व्हिडिओग्राफी

एम्स भुवनेश्वरचे संचालक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी राज्य, केंद्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विद्यमान नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अधिकृतपणे मृतदेह बीएमसी आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतील. बीएमसीने जारी केलेल्या एसओपीनुसार, संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाईल.

AIIMS भुवनेश्वरला पहिल्या टप्प्यात 162 मृतदेह मिळाले होते आणि त्यापैकी 81 मृतदेह मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले होते. नंतर, डीएनए चाचणीनंतर आणखी 53 मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, परंतु इतर 28 मृतदेहांवर कोणीही हक्क सांगितला नाही.

Odisha Train Accident
विनाकारण अटक केल्यास काय होते? वाचा, कसा शिकवला हायकोर्टाने पोलिसांना धडा

हा रेल्वे अपघात 2 जून रोजी झाला होता आणि त्यात 296 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस बहंगा बाजार स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने ही घटना घडली. रुळावरून घसरलेले काही डबे नंतर विरुद्ध दिशेने हावड्याकडे परतणाऱ्या यशवंतपूर एक्स्प्रेसला धडकले. त्यामुळे हा अपघात भीषण झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com