ISRO
ISRO Dainik Gomantak

ISRO: अंतराळवीरांच्या सुरक्षतेसाठी होणारी उड्डाण चाचणी रद्द; जाणून घ्या कारण

ISRO: हे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून करण्यात येणार होते.
Published on

ISRO: चंद्रायान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता इस्रोकडून गगनयान अंतर्गत अंतराळवीरांच्या सुरक्षतेसाठी उड्डाण चाचणी करण्यात येणार होते. हे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण करण्यात आले नाही, लवकरच हे प्रक्षेपण यशस्वीरित्या केले जाईल अशी अधिकृत माहीती इस्रोकडून देण्यात आली आहे.

इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. गगनयान मोहीमेअंतर्गत हे प्रक्षेपण इस्रोसाठी महत्वाचे आहे कारण यातून अवकाशाचा अभ्यास केला जाणार आहे. इस्रोचे हे मिशन देशाला अंतराळ संशोधन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला दिशा देऊ शकते.

आता इस्रोचे चीफ सोमनाथ यांनी हे प्रक्षेपण काही तांत्रिक कारणांमुळे होऊ शकले नाही. मात्र व्हेइकल व्यवस्थित असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. प्रक्षेपण होण्याआधी नक्की काय अडचण आली याचा आम्ही सविस्तर अभ्यास करु आणि लवकरच हे प्रक्षेपण केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

भारताची गगनयान मोहीम २०२५ मध्ये सुरू होणार आहे. भारतासाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामध्ये कोणत्या अडचणी येऊ नयेत यासाठी आत्ता चाचण्या घेण्यात येणार आहेत.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com