Faizan Bakhtiar: ISIS दहशतवादी फैजान बख्तियार गजाआड; बगदादीचे व्हिडिओ करायचा शेअर?

Lucknow Police Arrested Terrorist Faizan Bakhtiar: उत्तर प्रदेश पोलिसांच्या लखनऊ एटीएसने ISIS दहशतवादी फैजान बख्तियारला अटक केली आहे.
ISIS News
ISIS NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Lucknow Police Arrested Terrorist Faizan Bakhtiar: उत्तर प्रदेश पोलिसांच्या लखनऊ एटीएसने ISIS दहशतवादी फैजान बख्तियारला अटक केली आहे, ज्याचे नेटवर्क संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरले होते. जो संपूर्ण उत्तर प्रदेशात ISIS च्या कारवाया करत होता. 3 नोव्हेंबर 2023 रोजी एटीएस लखनऊ पोलिस ठाण्यात फैजानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फैजानच्या आधी लखनऊ पोलिसांनी अब्दुल्ला अर्सलान, माझ बिन तारिक, बाजीहुद्दीनसह 8 दहशतवाद्यांना अटक केली होती.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी

एटीएस लखनऊच्या म्हणण्यानुसार, फैजान अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून एमएसडब्ल्यू (मास्टर इन सोशल वर्क) करत होता. बख्तियार हा वाँटेड गुन्हेगार होता. त्याच्याविषयी माहिती देणाऱ्यास 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बख्तियार युसूफ यांचा मुलगा फैजान बख्तियार, वय 24, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, जो बगदादीचे व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असे. फैजानला आज (17 जानेवारी रोजी) अलीगढ जिल्ह्यातून अटक करण्यात आली. फैजानने उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ISIS मॉड्यूलचे जाळे पसरवले होते.

ISIS News
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! चहा मिळण्यास उशीर झाल्याने पतीने तलवारीने केली पत्नीची हत्या

बगदादीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचे

उत्तर प्रदेशातील करेली येथील जीटीबी नगर येथील रहिवासी असलेल्या फैजानने एटीएसला चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने प्रयागराज येथील रहिवासी रिझवान अश्रफकडून आयएसआयएसचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर, त्याने त्याच्या अटक केलेल्या साथीदारांसह अलीगढ आयएसआयएस मॉड्यूल तयार केले आणि अनेक तरुणांना मॉड्यूलशी जोडले. तो बगदादीचे व्हिडिओ त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असे. 5 नोव्हेंबर 2023 रोजी लखनऊ एटीएसने ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि 7 लोकांना अटक केली, त्यानंतर फैजान फरार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com