IRCTC Onam Special Train
IRCTC Onam Special TrainDainik Gomantak

IRCTC: 6 ऐवजी 12 रेल्वेची तिकीट बुक करायची असतील तर हे करा...

IRCTC: 6 ऐवजी 12 रेल्वेची तिकीट बुक करायची असतील तर IRCTC खाते लगेच आधारशी लिंक करा
Published on

IRCTC Update : देशांतर्गत प्रवास करताना अनेक जन रेल्वेला आपली पहिली पसंती देतात. त्याचे कारण रेल्वेचा प्रवास सोईचा आणि स्वस्त असतो. त्यामुळेच हजारो लोक दररोज स्लीपर क्लास ते एसी क्लासचा प्रवास करतात. पण प्रवास (Travel) म्हटला की आधी तिकीट काढणं हे आलचं. पण जेंव्हा घरातील आप्त किंवा मित्र परिवारासह फिरण्यास जायचं आहे. मात्र जायचं कसं असा नेमका प्रश्न समोर येतो.

त्यावेळी अनेक जन इंडियन रेल्वे (Indian Railways) केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटला (IRCTC) भेट देतात. मात्र एका वेळी तुम्ही फक्त 6 तिकीट बुक करू शकता. त्यावेळी खरी अडचण येते. त्यावेळी काय करावं असा प्रश्न पडतो. तर योग्य मार्ग माहित नसल्याने अनेक जन खासगी वाहनांचा आधार घेतात. पण तुम्ही जर 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करू शकला असता तर? हो तुम्हाला जर 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करता येतील. तुम्हाला फक्त तुम्हाला तुमचे IRCTC खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक करावे लागेल. तर चला मग 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करू.... (IRCTC account link to Aadhaar card for book train tickets

IRCTC खाते आधार कार्डशी कसे लिंक करालं

1. जर तुम्हाला दर महिन्याला 6 ऐवजी 12 तिकीट (Tickets) बुक करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट http://irctc.co.in वर जावे लागेल.

2. त्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्डच्या मदतीने तुमच्या IRCTC खात्यात लॉग इन करावे लागेल. येथे तुम्हाला 'माय अकाउंट' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

IRCTC Onam Special Train
RRB NTPC: रेल्वे भरती बोर्डाने NTPC उमेदवारांना दिला मोठा दिलासा

RRB NTPC: रेल्वे भरती बोर्डाने NTPC उमेदवारांना दिला मोठा दिलासा3. यानंतर तुम्हाला 'आधार लिंक'चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आधार कार्ड आणि 12 अंकी आधार क्रमांक टाकावे लागेल.

4. त्यानंतर तुम्हाला 'सेंड' पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल (Mobile) नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल, जो तुम्हाला भरावा लागेल. असे केल्याने तुमचे खाते आधार कार्डशी (Adhar card) लिंक केले जाईल. ज्यामुळे दर महिन्याला 6 ऐवजी 12 तिकीट बुक करू शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com