EX Tamil Nadu DGP Rajesh Das Convicted: महिला IPS चा लैंगिक छळ केल्याप्रकरणी माजी DGP दोषी, न्यायालयाने सुनावली 3 वर्षांची शिक्षा

Tamil Nadu: विल्लुपुरम न्यायालयाने एका निलंबित आयपीएस अधिकाऱ्याला एका महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
EX Tamil Nadu DGP Rajesh Das Convicted
EX Tamil Nadu DGP Rajesh Das ConvictedDainik Gomantak
Published on
Updated on

EX Tamil Nadu DGP Rajesh Das Convicted: तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना सहकारी आयपीएस महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आज तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

विल्लुपुरम न्यायालयाने एका निलंबित आयपीएस अधिकाऱ्याला एका महिला अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

दरम्यान, महिला आयपीएस अधिकाऱ्याने फेब्रुवारी 2021 मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत आरोप केला होता की, तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पादी के पलानीसामी यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असताना दास यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले.

EX Tamil Nadu DGP Rajesh Das Convicted
Tamil Nadu: परवानगी घ्या अन् मगच तपास करा! तामिळनाडूने मागे घेतली सीबीआयची संमती

काय होते संपूर्ण प्रकरण

फेब्रुवारी 2021 मध्ये, तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) खळबळ उडाली होती, जेव्हा AIADMK सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पादी के पलानीसामी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले राजेश दास यांच्यावर एका महिला आयपीएसने लैंगिक छळाचा आरोप केला होता.

त्यानंतर सरकारने तात्काळ कारवाई करत दास यांना सेवेतून निलंबित केले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाची चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती स्थापन केली होती.

EX Tamil Nadu DGP Rajesh Das Convicted
Tamil Nadu Politics: भाजपने जारी केली ‘DMK Files’, CM स्टालिन यांच्यासह पक्षातील नेत्यांवर केले गंभीर आरोप

दुसरीकडे, न्यायालयीन सुनावणीदरम्यान, फिर्यादी दलाच्या एका सदस्याने सांगितले की, " तब्बल पोलिस कर्मचार्‍यांसह 68 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दास अपील करु शकतात आणि तात्काळ जामीन मागू शकतात."

तसेच, 2021 मध्ये हे प्रकरण निवडणुकीचा (Election) मुद्दा बनले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते एम के स्टॅलिन यांनी सत्तेत आल्यास योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि शिक्षेचे आश्वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com