Will Jacks Century: गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात आरसीबीचा विस्फोटक फलंदाज विल जॅक्सने शानदार खेळी खेळली. या सामन्यातील आपल्या खेळीदरम्यान जॅक्सने अवघ्या 41 चेंडूंमध्ये 10 षटकार आणि 5 चौकार लगावत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, 50 धावांची इनिंग खेळल्यानंतर जॅक्सला शतक झळकावण्यासाठी फक्त 6 मिनिटे लागली. त्याने पहिल्या 50 धावा 31 चेंडूत केल्या.
यानंतर जॅक्सने गीअर्स बदलला आणि पुढील 50 धावा अवघ्या 6 मिनिटांत पूर्ण केल्या. विल जॅक्सच्या या शतकी खेळीने क्रिकेटप्रेमींना मनमोहित केले. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने 9 गडी राखून विजय मिळवला. या लीगमधील विल जॅक्सचे हे पहिले शतक होते आणि त्याला ''सामनावीर'' म्हणूनही गौरवण्यात आले. या सामन्यात विराट कोहलीनेही (Virat Kohli) जॅक्सला पूर्ण साथ दिली. विराटनेही 70 धावांची नाबाद खेळी खेळली.
संध्याकाळी 6.41 वाजता जॅक्स 50 धावांवर फलंदाजी करत होता. यानंतर त्याने 6.47 पर्यंत आपले अफलातून शतक पूर्ण केले. या शतकी खेळीच्या जोरावर विल जॅक्सने आयपीएल बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडला. वास्तविक, 50 धावा पूर्ण केल्यानंतर जॅक्सने पुढच्या 50 धावा फक्त 10 चेंडूत पूर्ण केल्या. यासह त्याने ख्रिस गेलचा (Chris Gayle) विक्रम मोडीत काढला. ज्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 50 धावा पूर्ण केल्यानंतर पुढच्या 50 धावा 13 चेंडूत पूर्ण केल्या होत्या.
दरम्यान, जॅक्सने आपल्या खणखणीत शतकाच्या जोरावर अनेक विक्रमही नावावर केले. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. या बाबतीत ख्रिस गेलचे नाव आघाडीवर आहे, ज्याने 30 चेंडूत शतक झळकावले होते. जॅक्स आणि विराटच्या शानदार भागीदारीच्या जोरावर आरसीबीने विजय नोंदवला. जॅक्सने शेवटच्या षटकात राशीद खानचा चांगलाच समाचार घेतला. या षटकात राशिदने 29 धावा दिल्या.
28 धावा (5 चेंडू) - विल जॅक्स (2024)
26(5) – ख्रिस गेल (2018)
20(5) – मनन वोहरा (2017)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.