नुपूर शर्मांना पाकिस्तानी पत्रकाराने दिला पाठिंबा, 'अडचण असेल तर...'

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरुच आहे.
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरुच आहे. नुपूर यांनी इस्लाम आणि पैगंबर यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजपने दिल्ली भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी केली आहे. याप्रकरणी पाकिस्तानी वंशाच्या पत्रकार ताहा सिद्दीकी यांचे एक वक्तव्य व्हायरल होत आहे.

काय म्हणाला?

भारतीय जनता पक्ष (BJP) आणि नुपूर शर्मा यांच्यावर हल्ला करण्याऐवजी मुस्लिम नेत्यांनी एकत्र यावे आणि जे काही चुकीचे लिहिले आहे ते काढून टाकावे, असे ताहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु जर ते खरे नसेल तर कोणीही प्रेषित मोहम्मद यांच्यावर बालविवाह केल्याचा आरोप करु शकत नाही.

Nupur Sharma
नुपूर शर्मांच्या वतीने नेदरलँडचे खासदार मैदानात, ''काही चुकीचं बोलल्या नाहीत''

लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

ताहा यांच्या ट्विटनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. पाकिस्तानातील (Pakistan) अनेक लोकांनी त्याला अल्लाहचे भय बाळगण्याचा इशारा दिला आहे. तर अनेकांनी त्याला कुराण आणि हदीस वाचण्याचा आणि मोहम्मद समजून घेण्याचा सल्ला दिला आहे.

काही लोकांनी असेही म्हटले आहे की, सध्या गैरमुस्लिमांकडून इस्लामवर असंख्य टीका होत आहेत. अशा परिस्थितीत नुपूर शर्मावर हल्ला करण्याऐवजी हदीसची पडताळणी करावी. प्रेषित मोहम्मद यांची योग्य माहिती जगासमोर आली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे.

Nupur Sharma
नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस, भीम आर्मीने केली घोषणा

नेदरलँडचे खासदार नुपूर यांच्या समर्थनार्थ उतरले मैदानात

तत्पूर्वी, नेदरलँडचे (Netherlands) उजव्या विचारसरणीचे खासदार गीर्ट वाइल्डर्स म्हणाले की, ''तुष्टीकरण कधीही काम करत नाही. तेव्हा माझ्या प्रिय भारतीय मित्रांनो, इस्लामिक देशांना घाबरु नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि अभिमान बाळगा. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्माचे रक्षण करण्याचा निर्धार करा.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dharmendra Pradhan Reaction
Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
Constitutional right to protest India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com