PM मोदींच्या हस्ते INS Vikrant चे अनावरण

भारतीय नौदलात झाली सामील ; आत्तापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका
INS Vikrant
INS VikrantDainik Gomantak
Published on
Updated on

INS Vikrant: आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल 13 वर्षे लागली, अशी INS विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलात सामील केली. यावेळी पंतप्रधानांनी नवीन नौदल चिन्हाचे ही अनावरण केले आहे.

(INS Vikrant PM Modi will hand over the first indigenous ins vikrant the country s largest ship 2022)

INS Vikrant ही विमानवाहू नौका मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आली आहे. भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी विमानवाहू नौका आहे. भारतापूर्वी केवळ पाच देशांनी 40 हजार टनांपेक्षा जास्त वजनाची विमानवाहू युद्धनौका तयार केली आहे. INS विक्रांतचे वजन 45,000 टन आहे.

भारतीय नौदलासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे

आजचा दिवस हा भारतीय नौदलास महत्त्वाचा आहे, कारण आज देशाला पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका मिळाली. तसेच आज देशालाि ब्रिटीशांच्या काळातील खुणापासूनही मुक्तता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस विक्रांत देशाला सुपूर्द केली. केरळमधील कोचीन शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेल्या या विमानवाहू नौकेच्या निर्मितीसाठी 20,000 कोटी रुपये खर्च आला आहे. या जहाजाच्या अधिकृत समावेशामुळे नौदलाची ताकद दुप्पट झाली आहे.

INS Vikrant
Teesta Setalwad यांच्या जामिनावर SC चं मोठं वक्तव्य, 'GJ सरकारने FIR चा आधार सांगावा'

ब्रिटीशांच्या काळापासून मुक्ती मिळेल

या कार्यक्रमादरम्यान मोदी नौदलाच्या नव्या चिन्हाचे अनावरणही केले. ते समृद्ध भारतीय सागरी वारशाचे प्रतीक असेल. नौदलाच्या नवीन डिझाईनमध्ये आडव्या आणि उभ्या दोन लाल पट्ट्यांसह पांढरा ध्वज आहे. तसेच, दोन्ही पट्ट्यांच्या भेटीच्या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय चिन्ह (अशोक स्तंभ) कोरलेले आहे.

भारतीय नौदल ब्रिटिशांच्या काळातच अस्तित्वात आले. भारतीय नौदलाच्या सध्याच्या ध्वजावर वरच्या डाव्या कोपर्‍यात तिरंगा असलेला सेंट जॉर्ज क्रॉस आहे. 2 ऑक्टोबर 1934 रोजी नौदल सेवेचे नाव रॉयल इंडियन नेव्ही असे ठेवण्यात आले.

26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर, रॉयल रद्द करण्यात आले आणि भारतीय नौदलाचे नाव बदलण्यात आले. तथापि, ब्रिटनचा वसाहती ध्वज हटविला गेला नाही. आता पंतप्रधान मोदी भारतीय नौदलाला नवा ध्वज दिला.

INS Vikrant
Video: समुद्रात 'जय हो': INS Vikrant आज होणार नौदलात दाखल

बनवायला 13 वर्षे लागली

फेब्रुवारी 2009 मध्ये बांधकाम सुरू झाले. ऑगस्ट 2013 मध्ये विक्रांतला पहिल्यांदा पाण्यात उतरवण्यात आले. या विमानवाहू नौकेच्या बेसिन चाचण्या नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झाल्या. यानंतर जुलै 2022 मध्ये त्याच्या समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या. चाचणी पूर्ण झाल्यानंतर जुलै 2022 मध्ये कोचीन शिपयार्डने ते नौदलाकडे सुपूर्द केले.

ते बनवण्यासाठी 20 हजार कोटी खर्च आला. या जहाजाचे वेगवेगळे भाग 18 राज्यांमध्ये बनवले आहेत. या विमानवाहू नौकेत 76% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज एखाद्या टाउनशिपइतकी वीज पुरवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com