मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Australian players harassment: इंदूर पोलिसांनी याप्रकरणी अकील खान या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याविरोधात छेडाछाडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Australian Cricketers Molestion case
Australian players harassmentDainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडुंची छेड काढल्याची लज्जास्पद प्रकार गुरुवारी उघडकीस आला. ऑस्ट्रेलियन खेळाडू हॉटेलमधून कॅफेच्या दिशेने जात असताना इंदूरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी इंदूर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

इंदूर पोलिसांनी याप्रकरणी अकील खान या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याविरोधात छेडाछाडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू इंदूर येथील रॅडिसन ब्ल्यु हॉटेलमध्ये वास्तव्यास थांबल्या आहेत.

Australian Cricketers Molestion case
गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

गुरुवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर खेळाडुंनी तत्काळ याबाबत माहिती दिली होती सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर ऑस्ट्रेलियन टीमचे व्यवस्थापकही घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅफेच्या दिशेने जात असताना संशयितांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. संशयितांनी एका खेळाडुला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यावेळी एक प्रत्यक्षदर्शीने संशयिताच्या गाडीचा नंबर नोंद करुन घेतला, त्यामुळे संशयिताचा शोध घेण्यास मदत झाली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Australian Cricketers Molestion case
हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

संशयित अकीलला पोलिसांनी अटक केली त्यावेळी त्याचा पाय आणि हाताला इजा झाल्याचे दिसून आले. त्याच्या पायाला आणि हाताला पट्टी बांधल्याचे दिसून येत आहे. पोलिस स्थानकात तो एका पायावर लंगडी घालत आला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com