Russia-Ukraine Crisis: RSS म्हणाले... युक्रेनवरील हल्ला थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणा

कुमार (Indresh Kumar) यावेळी म्हणाले की, 'युद्धाने समस्या सुटत नाहीत. केवळ मानवतेचे नुकसान होते.'
Russia-Ukraine Crisis
Russia-Ukraine CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

युक्रेनवर रशियाने (Russia) केलेल्या आक्रमणानंतर रशियन सैन्याने युक्रेनच्या काही महत्त्वाच्या प्रातांवर ताबा मिळवला आहे. तसेच रशियन सैन्याने कीवमध्ये दाखल होत ताबा मिळल्याचे सांगण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर शुक्रवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी केंद्र सरकारला (Central Government) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर इतर देशांसह युक्रेनवर लष्करी हल्ले थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. कुमार यावेळी म्हणाले की, 'युद्धाने समस्या सुटत नाहीत. केवळ मानवतेचे नुकसान होते.' (Indresh Kumar Has Called On Russia To Put Pressure On It To Stop Its Attacks On Ukraine)

दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी जागतिक नेते, मुत्सद्दी अधिकारी आणि नागरी समाजाद्वारे पुतीन यांना चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.

Russia-Ukraine Crisis
Russia-Ukraine Crisis: संभाव्य युद्धाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम शक्य

तसेच, आपल्या संदेशात कुमार पुढे म्हणाले की, ''भारतासह जगभरातील सरकारे, मुत्सद्दी, संरक्षण तज्ञ आणि नागरी समाज यांनी एकत्र येऊन रशियन राष्ट्राध्यक्षांवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणला पाहिजे. भारताला शांतता हवी आहे. युद्ध वाढेल अशी कोणतीही परिस्थिती असू नये. युद्धाची भीषणता अत्यंत क्लेशदायक असते.''

Russia-Ukraine Crisis
Russia-Ukraine Crisis Impact: जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण

दरम्यान, इंद्रेश कुमार राष्ट्रीय मुस्लिम मंच आणि राष्ट्रीय ख्रिश्चन मंचचे संस्थापक आहेत. कुमार यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन नेत्यांना रशियाला शांतता, सौहार्द आणि बंधुतेच्या चालण्याचा सल्ला देण्याचे आवाहन केले. युद्धाने कोणतीही समस्या सुटू शकत नाही. युद्धात हजारो निष्पाप लोक मरतात. तसेच लाखो लोक बेघर होतात. यासोबतच हजारो कोटींचे नुकसानही होते.

शिवाय, रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. आजचा युद्धाचा दुसरा दिवस आहे. त्याचवेळी, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी रशियाने युक्रेनवर लष्करी आक्रमण सुरु करण्याबाबत आणि हिंसाचार त्वरित संपवण्याबाबत बोलणे झाले आहे. यासोबतच युक्रेनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतण्याला भारत सर्वोच्च प्राधान्य देतो, असेही स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com