Vaccine 

Vaccine 

Dainik Gomantak 

लसीकरणात भारताचे अर्धशतक; 50 टक्केहून अधिक लोकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

देशात 88% लोकांना लसीचा पहिला डोस आणि 58% लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे.
Published on

देशातील निम्म्याहून अधिक लोकांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. मांडविया म्हणाले की, "आमच्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे, देशात 88% लोकांना पहिला डोस आणि 58% लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. राज्यांकडे आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत आणि येत्या दोन महिन्यात लस उत्पादन क्षमता वाढवली जाईल."

<div class="paragraphs"><p>Vaccine&nbsp;</p></div>
कर्नाटकमध्ये दोन शैक्षणिक संस्थांमध्ये कोरोनाचा कहर, पाच ओमिक्रॉन पॉझिटिव्ह

ते पुढे म्हणाले, “भारतामध्ये (India) दर महिन्याला लसीचे (Vaccine) 31कोटी डोस तयार केले जातात. पुढील 2 महिन्यात ही क्षमता दरमहा 45 कोटी डोसपर्यंत वाढेल. आम्ही दररोज परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत.” केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसारित केलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 6,563 लोकांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे आणि 132 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com