Vikram-S Launching: भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण; देशात पहिल्यांदाच खासगी रॉकेटचे प्रक्षेपण

'इस्त्रो'ची नवी कामगिरी; जगातील मोजक्या देशामध्ये भारताचा समावेश
Vikram-S Launching:
Vikram-S Launching:Dainik Gomantak
Published on
Updated on

Vikram-S Launching: अंतराळ क्षेत्रात भारतासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कारण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) प्रथमच विक्रम-एस या खासगी रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे. हैदराबाद येथेल स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने याबाबत माहिती दिली. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आले.

Vikram-S Launching:
Farooq Abdullah Resigns: फारुख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

या यशाने अंतराळात खासगी रॉकेट पाठवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाले आहे. या मिशन ‘प्रारंभ’ असे नाव दिले गेले होते. हा क्षण भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. देशाती खासगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्र यामुळे खुले झाले आहे. इस्त्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्यावरून या रॉकेटला विक्रम एस नाव दिले आहे.

भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन प्राधिकरण केंद्र (इन-स्पेस) चे अध्यक्ष पवन गोएंका म्हणाले की, भारतात खासगी क्षेत्रासाठी ही मोठी झेप आहे. स्कायरूट ही रॉकेट प्रक्षेपणासाठीची अधिकृत पहिली भारतीय कंपनी आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हे ऐतिहासिक यश असल्याचे म्हटले आहे.

Vikram-S Launching:
Doctor बनला हैवान, एक-दोन नव्हे तर चार मुली ठरल्या शिकार; तिसऱ्या पत्नीचा खुलासा

कमी बजेटमध्ये प्रक्षेपण

या रॉकेटचे प्रक्षेपण कमी बजेटमध्ये करण्यात आले आहे. त्यासाठी रॉकेटच्या इंधनात बदल करण्यात आला होता. यात LNG आणि लिक्विड ऑक्सिजनचा वापर केला जातो. हे इंधन किफायती असण्यासह प्रदुषण मुक्तदेखील आहे. दरम्यान, प्रक्षेपणापुर्वी स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने नागपूर येथे 25 नोव्हेंबर 2021 रोजी चाचणी घेतली होती. तेव्हा क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com