Monkeypox Case In India: UAE मधून केरळला परतलेल्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण

त्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली आणि तो परदेशातील मंकीपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात होता.
Monkeypox Case In India
Monkeypox Case In IndiaANI
Published on
Updated on

Monkeypox Case In India: भारतात मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईहून कोल्लमला परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासात त्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचा विषाणू असल्याची पुष्टी झाली आहे.

वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, त्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली आणि तो परदेशातील मंकीपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात होता. केरळ सरकारने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बाधित व्यक्तीची प्रकृती अजूनही स्थिर आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यात आली आहे. 12 जुलै रोजी संक्रमित व्यक्ती राज्यात पोहोचली होती.

केंद्राचा इशारा

मंकीपॉक्सच्या पुष्टी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक बहु-अनुशासनात्मक पथक केरळला पाठवले आहे. ही टीम ग्राउंड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांची शिफारस करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागांशी जवळून काम करेल.

Monkeypox Case In India
'Monkeypox'च्या मुद्द्यावर केंद्राचे राज्य सरकारला निर्देश, जगभरात आढळली 3413 प्रकरणे

मंकीपॉक्सबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुष यांनी आज राज्यांना पत्र लिहून मंकीपॉक्ससाठी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, WHO नुसार, 50 देशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 22 जून या कालावधीत प्रयोगशाळांमध्ये मंकीपॉक्सची 3,413 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की यापैकी बहुतेक प्रकरणे युरोपियन प्रदेश आणि अमेरिका खंडातून आली आहेत.

Monkeypox Case In India
धर्मीची ओळख न दाखवता रिलेशनशीपच्या नावाखाली मुलीवर केला 2 वर्ष बलात्कार

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. मंकीपॉक्सची लक्षणे स्मॉलपॉक्सच्या रुग्णांसारखीच असतात. जरी त्याचे संक्रमण वैद्यकीयदृष्ट्या कमी गंभीर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com