Anju Nasrullah Love Story: देशात मागील काही दिवसांपासून सीमा हैदरची लव्हस्टोरी चर्चेत आहे. सचिन मीनाच्या प्रेमाखातर सीमा पाकिस्तानातून भारतात आली. दरम्यान, आपल्या प्रेमीला भेटण्यासाठी एक भारतीय महिला सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचली आहे.
ऑनलाइन PUBG खेळताना सीमा हैदर सचिनच्या प्रेमात पडली आणि नंतर नेपाळमार्गे भारतात पोहोचली.
त्याचवेळी, अंजू नावाची भारतीय महिला तिच्या फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नसरुल्लाह हा खैबर पख्तूनख्वामधील दीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम फुलले. यानंतर अंजूने ठरवले की, ती नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणार.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजू 21 जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानात (Pakistan) पोहोचली आहे. तिच्या पासपोर्टवरील नोंदीवरुन ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, अंजूच्या व्हिजिट व्हिसाची मुदत अद्याप संपलेली नाही.
राजस्थानमधील (Rajasthan) रहिवासी असलेल्या अंजूने खैबर पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील नसरुल्लाहशी फेसबुकवर मैत्री केली, त्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. नसरुल्लाह हा दीर जिल्ह्यात शिक्षक म्हणून काम करायचा.
पण तो आता वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. दोघांनी सोशल मीडियावर भेटल्याची पुष्टी केली आहे. अंजूने सांगितले की, ती पाकिस्तानात फक्त आणि फक्त नसरुल्लाहला भेटण्यासाठी आली आहे.
अंजूचा पासपोर्टचा फोटो पाहिल्यानंतर ती 21 जुलै रोजी पाकिस्तानात दाखल झाल्याचे समजते. अंजू 35 वर्षांची आहे, तर नसरुल्लाह 29 वर्षांचा आहे.
पासपोर्टवरील माहितीनुसार, अंजूचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. पण ती राजस्थानची आहे. सीमाच्या प्रकरणादरम्यान अंजूने प्रेमासाठी सीमा ओलांडली हा चर्चेचा विषय बनला आहे.
सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा अंजूबाबत सतर्क आहेत. अंजूचीही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, त्यामध्ये ती येथे का आली आहे, अशी विचारणा करण्यात आली आहे.
प्रत्युत्तरादाखल अंजूने सांगितले की, ती नसरुल्लाहला भेटण्यासाठी येथे आली आहे, कारण ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.