भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवीन ग्रह, गुरू पेक्षा किती मोठा तर पृथ्वीपासून नेमका कुठे... जाणून घ्या

अहमदाबादस्थित फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांनी एक नवीन ग्रह (Exoplanet) शोधला आहे,
Indian scientist found new exoplanet
Indian scientist found new exoplanet Dainik Gomantak

अहमदाबाद (Ahmadabad ) स्थित फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (Physical Research Lab. ) मधील शास्त्रज्ञांनी एक नवीन ग्रह (Exoplanet) शोधला आहे, जो पृथ्वीपासून 725 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरत आहे. एक्सोप्लॅनेट्स असे आहेत जे आपल्या सौर मंडळाच्या बाहेर आहेत आणि सूर्याऐवजी ताऱ्याभोवती फिरतात. वैज्ञानिकांनी शोधलेल्या या नवीन ग्रहाचा आकार गुरू ग्रहापेक्षा 1.4 पट मोठा आहे आणि तो पृथ्वीच्या 3.2 दिवसांत ताऱ्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.(Indian scientist found new exoplanet)

शास्त्रज्ञांच्या मते, आकाराने मोठे असूनही त्याचा आकार गुरू ग्रहाच्या 70 टक्के आहे. याबाबत इंडियन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट (इस्रो) ने सांगितले की, प्रोफेसर अभिजित चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील पीआरएलच्या एक्सोप्लॅनेट शोध आणि अभ्यास गटाने हा ग्रह शोधला आहे. नवीन ग्रह आणि त्याचा तारा यांच्यातील अंतर हे सूर्य आणि बुध यांच्यातील अंतराच्या एक दशांश आहे. या नवीन ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान 2000 अंश केल्विन आहे.PARAS स्पेक्ट्रोग्राफच्या मदतीने हे शोधण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे. पारस द्वारे एक्सोप्लॅनेटचे वस्तुमान देखील शोधले जाते. ग्रहाच्या आकारमानाचा आणि वस्तुमानाचा अंदाज घेण्यासाठी डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान ही मोजमापे घेण्यात आली. याशिवाय, जर्मनीच्या TCES स्पेक्ट्रोग्राफद्वारे एप्रिल 2021 मध्ये फॉलो-अप मोजमाप देखील घेण्यात आले होते.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, हेन्री ड्रेपर कॅटलॉगनुसार ग्रहाभोवती फिरणाऱ्या ताऱ्याला एचडी 82139 आणि TESS कॅटलॉगनुसार TOI 1789 असे नाव दिले जाईल. त्याच वेळी, इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) च्या शब्दावलीनुसार ग्रहाचे नाव TOI 1789b किंवा HD 82139b असेल. या शोध पथकात भारतीय शास्त्रज्ञांशिवाय युरोप आणि अमेरिकेतील सहकारीही होते.

Indian scientist found new exoplanet
यूएफओ आणि एलियन्सचे मोठे रहस्य उघड, एफबीआयच्या अहवालात धक्कादायक माहिती

याआधी जून 2018 मध्ये, पीआरएलच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेल्या नवीन एक्सोप्लॅनेटचाही शोध लावला होता. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या 27 पट होते. शास्त्रज्ञांनी सांगितले होते की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान 600 अंश सेल्सिअस आहे. त्याच वेळी, तो पृथ्वीच्या 6 पट आहे.अलीकडेच, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की भारतीय शास्त्रज्ञांनी एक पद्धत विकसित केली आहे जी आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांवरून प्राप्त झालेल्या डेटाची अचूकता वाढवू शकते. या पद्धतीला क्रिटिकल नॉईज ट्रीटमेंट अल्गोरिदम असे म्हणतात आणि ते एक्सोप्लॅनेटच्या वातावरणाचा अधिक अचूकतेने अभ्यास करण्यास मदत करू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com