Smuggling Of Liquor: फिल्मी स्टाईलमध्ये दारुची तस्करी, ट्रेन थांबवण्यासाठी करायचे...

Indian Railway: आरपीएफ पथकाने अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी रेल्वे ट्रॅकच्या जॉइंटवर नाणे ठेवून ट्रेन थांबवायची आणि नंतर दारुची खेप उतरवायची.
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak

Indian Railway: बिहारमधील समस्तीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आरपीएफ पथकाने अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी रेल्वे ट्रॅकच्या जॉइंटवर नाणे ठेवून ट्रेन थांबवायचे आणि नंतर दारुची खेप उतरवायचे.

या टोळीतील तिघांना आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. रवी कुमार सिंग, विशाल कुमार सिंग आणि निखिल कुमार सिंग अशी आरोपींची नावे आहेत. या लोकांकडून पोलिसांनी 35 दारुच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत.

ही टोळी असे काम करायची

ही टोळी अतिशय हुशारीने काम करायची. जिथे त्यांना दारुची खेप उतरवायची, तिथे ते रेल्वे रुळाच्या जॉइंटवर एक नाणे ठेवत असे, त्यामुळे समोरचा सिग्नल शॉर्ट सर्किटमुळे रेड व्हायचा आणि ट्रेन थांबायची.

यानंतर ट्रेनमधून दारु काढून आरोपी (Accused) दुचाकीवरुन सहज फरार व्हायचे. समस्तीपूर-दरभंगा रेल्वे ट्रॅकवर ही टोळी हे काम करत असे.

ट्रेन किसनपूर स्थानकाच्या दिशेने जात असताना टोळीतील एक सदस्य रुळावर नाणे ठेवून सिग्नल रेड करायचा, त्यामुळे ट्रेन थांबयची.

Indian Railway
पटनामध्ये दहशतवादी टोळीचा पर्दाफाश, पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा होते लक्ष्य

दरम्यान, किसनपूर स्थानकाच्या पुढे सिग्नल रेड झाल्याच्या तक्रारी रेल्वे सिग्नल नियंत्रण कक्षाला मिळू लागल्यावर त्याची चौकशी करण्यात आली.

तपासात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत कोणताही दोष आढळून आला नाही. ट्रेनमध्ये आणि किसनपूर स्टेशनच्या आसपास आरपीएफची टीम सिव्हिल ड्रेसमध्ये तैनात होती.

आरोपींनी रेल्वे रुळावर नाणे ठेवून सिग्नल रेड करुन दारु उतरवण्यास सुरुवात करताच आरपीएफच्या पथकाने तीन आरोपींना दारुच्या मोठ्या खेपेसह अटक केली.

Indian Railway
VIDEO: बिहार सरकारने 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाची तिकीटे वाटली मोफत!

आरपीएफचे निरीक्षक बीपी वर्मा यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी गाड्यांमधून दारुची खेप मिळवत असत. स्टेशनवर पकडले जाण्याच्या भीतीने समस्तीपूर-दरभंगा रेल्वे सेक्शनवर किसनपूर स्टेशनच्या आधी रेड सिग्नल लावून ट्रेन (Train) थांबवायचे. यानंतर रेल्वेतील दारु व्यापारी आरामात दारुची खेप खाली उतरवत असत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com