Indian Navy: आता शत्रूंची खैर नाही! नौदलाने युद्धनौकेवरून हवाई क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी, Watch Video

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असुन नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी केली आहे.
Indian Navy successfully undertook MRSAM firing from INS Visakhapatnam
Indian Navy successfully undertook MRSAM firing from INS VisakhapatnamDainik Gomantak
Published on
Updated on

MRSAM Firing From INS Visakhapatnam: भारतीय नौदलाच्या पदरी आणखी एक यश पडले आहे. नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी केली आहे.

या चाचणी दरम्यान, MRSAM ने अतिशय अचूकतेने लक्ष्य गाठले आहे. MRSAM पूर्णपणे भारतात उत्पादित आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. हे BDL हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री (IAI) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

MRSAM सप्टेंबर 2021 मध्ये IAF ताफ्यात समाविष्ट करण्यात आले. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी हवेत 360 अंश फिरून शत्रूंवर हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र 70 किलोमीटरच्या परिघात येणारे कोणतेही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, पाळत ठेवणारी विमाने आणि हवाई शत्रूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com