शत्रूंचा बिमोड करण्यासाठी ही युद्धनौका सज्ज, जाणून घ्या 'Made in India' DSV ची खासियत

Indian Navy Visakhapatnam: स्वदेशी बनावटीची डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स (DSVs) भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होण्यासाठी सज्ज आहे.
Visakhapatnam
VisakhapatnamDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Navy Visakhapatnam: स्वदेशी बनावटीची डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स (DSVs) भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होण्यासाठी सज्ज आहे. दोन जहाजांच्या बांधणीसाठी 2018 मध्ये हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) सोबत 2,392.94 कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. भारतीय नौदल नौवहन नियमांचे पालन करुन अशा प्रकारच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या जहाजाची निर्मिती करण्यात आली आहे.

डीएसव्ही खोल समुद्रात डायव्हिंग आणि पाणबुडी बचाव कार्यासाठी तैनात केले जाईल. 215 कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले हे जहाज 120 मीटर लांब आहे. हे जहाज 60 दिवस समुद्रात राहू शकते. एचएसएल भारतीय नौदलासाठी (Indian Navy) युद्धनौका तयार करणाऱ्या लीगमध्ये सामील होईल.

खासियत जाणून घ्या

डीएसव्ही खोल समुद्रात डायव्हिंग आणि पाणबुडी बचाव कार्यासाठी तैनात केले जाईल. 215 कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले हे जहाज 120 मीटर लांब आहे. हे जहाज 60 दिवस समुद्रात राहू शकते. एचएसएल भारतीय नौदलासाठी युद्धनौका तयार करणाऱ्या लीगमध्ये सामील होईल.

Visakhapatnam
PrayagRaj : एक प्रवासी ठरला डोकेदुखी; धावपट्टीवरच थांबवावं लागलं विमान

हेलिकॉप्टरने सुसज्ज असेल

हे ट्विन शाफ्ट कंट्रोलर पिच प्रोपेलर कॉन्फिगरेशनसह सुसज्ज आहे. यात 5.4 MW चे दोन डिझेल इंजिन आणि एकूण 12 MW क्षमतेचे पाच डिझेल जनरेटर आहेत. त्याची लांबी 119.4 मीटर, रुंदी 22.8 मीटर आणि खोली 10.4 मीटर आहे. ROV आणि साईड स्कॅन सोनारच्या सहाय्याने, हे अ‍ॅडव्हान्स हलके हेलिकॉप्टर / नेव्हल युटिलिटी हेलिकॉप्टरसह (Helicopter) कार्य करण्यास सक्षम असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com