Indian Navy Drug Bust: अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त; भारतीय नौदलाची मोठी कारवाई
भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदलासोबत संयुक्त कारवाई करत अरबी समुद्रातून 500 किलो ड्रग्ज जप्त केले. दोन बोटीतून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज 'क्रिस्टल मेथ' आहे. जप्त केलेल्या दोन्ही बोटी, त्यातील लोक आणि ड्रग्ज श्रीलंका सरकारकडे सोपवण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात देशात विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
अंदमानमधूनही 5,500 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले
अलीकडेच, भारतीय तटरक्षक दलाने 5,500 किलो मेथाम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले होते, ही कारवाई अंदमान-निकोबार सागरी क्षेत्रात करण्यात आली होती. अंदमान आणि निकोबारमधील बॅरेन बेटावर कोस्ट गार्डच्या पायलटला नियमित निरीक्षणादरम्यान एक संशयास्पद बोट दिसली. इशाऱ्यानंतरही ड्रग्ज तस्करांनी बोट पळवण्याचा प्रयत्न केला असता तटरक्षक दलाने कारवाई करत बोट ताब्यात घेतली.
भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्याचे कारण काय?
अमली पदार्थांची तस्करी केवळ देशाच्या सुरक्षेवरच नाही तर राजकीय स्थिरता आणि आर्थिक विकासावरही गंभीर परिणाम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगभरातील ड्रग्सच्या तस्करीची सध्याची बाजारपेठ सुमारे 650 अब्ज डॉलर्सची आहे, जी संपूर्ण जगाच्या बेकायदेशीर अर्थव्यवस्थेच्या 30 टक्के आहे. भारताचे (India) दुर्दैव हे की, देश अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गोल्डन ट्रॅंगलमध्ये अडकला आहे. अफगाणिस्ताननंतर म्यानमार अफूचा सर्वात मोठा उत्पादक आणि हेरॉइनचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे म्यानमारमधून भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते.
अमली पदार्थांची तस्करी
याशिवाय, अफगाणिस्तान, पाकिस्तान (Pakistan) आणि इराण हे देशही अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहेत. या तिन्ही देशांतील गुन्हेगार भारतात अंमली पदार्थांची विक्री करतात आणि भारताच्या सागरी भागातून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करुन ते पाश्चिमात्य आणि जगातील इतर देशांमध्ये पाठवले जाते. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.