India vs Pakistan: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! भारत-पाकिस्तान यांच्यात होणार महामुकाबला, आशिया कपमधील लढतीला भारत सरकारचा ग्रीन सिग्नल

India vs Pakistan Asia Cup 2025 Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मध्ये होणाऱ्या सामन्यावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर झाले आहेत.
 India vs Pakistan Asia Cup 2025 Match
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan Asia Cup 2025 Match: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मध्ये होणाऱ्या सामन्यावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर झाले आहेत. भारत सरकारने या सामन्याला खेळण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे चाहते आनंदात आहेत. हा हाय-व्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल.

अलीकडेच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध बिघडले होते. या हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये जवळपास चार दिवसांपर्यंत युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावपूर्ण परिस्थितीत आशिया कपमधील हा सामना रद्द होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही देशांतील राजकीय संबंधांचा खेळावरही परिणाम होईल असे वाटत होते, मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे हा सामना होणार हे निश्चित झाले आहे.

 India vs Pakistan Asia Cup 2025 Match
India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

क्रीडा मंत्रालयाची नवीन धोरणात्मक भूमिका

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत (India) सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने एक नवीन धोरण जाहीर केले. या धोरणानुसार, भारतीय संघ पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय (Bilateral) मालिका खेळणार नाही. तसेच, भारतीय संघ कोणत्याही सामन्यासाठी किंवा स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तानच्या संघालाही भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही.

मात्र, क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले की, आशिया कपसारख्या 'मल्टी-नॅशनल' (Multi-nation) टूर्नामेंटमध्ये होणारे सामने थांबवले जाणार नाहीत. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. याचा अर्थ केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर आमने-सामने येऊ शकतील.

 India vs Pakistan Asia Cup 2025 Match
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार, कधी अन् कुठं रंगणार सामना? जाणून घ्या सविस्तर

केवळ क्रिकेटच नाही, इतर खेळांवरही होणार परिणाम

क्रीडा मंत्रालयाची ही नवीन धोरणात्मक भूमिका केवळ क्रिकेटसाठीच मर्यादित नाही, तर ती इतर सर्व खेळांवरही लागू होणार आहे. यामुळे भविष्यात कोणताही पाकिस्तानी खेळाडू किंवा संघ कोणत्याही स्पर्धेसाठी भारतात येणार नाही आणि कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवणार नाही. त्यामुळे यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धा वगळता कोणत्याही खेळाच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांसमोर दिसणार नाहीत.

या धोरणामुळे आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामना निश्चित झाला आहे. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांसमोर खेळताना दिसतील, पण ते केवळ आंतरराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच शक्य होईल. या निर्णयामुळे राजकीय तणावाचा खेळावर होणारा थेट परिणाम टाळण्यास मदत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com