Jammu Kashmir: सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात

जम्मू -काश्मीरच्या(Jammu Kashmir) कठुआ(Kathua) येथे मंगळवारी एक हेलिकॉप्टर कोसळले(Helicopter Crash) आहे
Indian Army helicopter crashes in Jammu Kashmir
Indian Army helicopter crashes in Jammu KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू -काश्मीरच्या(Jammu Kashmir) कठुआ(Kathua) येथे मंगळवारी एक हेलिकॉप्टर कोसळले(Helicopter Crash) आहे . हे हेलिकॉप्टर भारतीय सैन्याचे(Indian Army) असून ते कठुआच्या रणजीत सागर धरणाजवळ कोसळले आहे(Ranjit Sagar Dam) . हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. दोन्ही वैमानिक सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.(Indian Army helicopter crashes in Jammu Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.20 च्या सुमारास भारतीय लष्कराच्या 254 आर्मी एव्हीएन स्क्वाड्रनच्या हेलिकॉप्टरने मामुन कॅंटमधून उड्डाण केले. हेलिकॉप्टर धरण परिसराजवळ कमी उंचीचा फेरा घेत होता, त्यानंतर ते धरणात कोसळले.पंजाबमधील पठाणकोट येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. सुमारे एक तासानंतर, बातमी आली की हेलिकॉप्टर रणजीत सागर धरणाजवळ नियमित उड्डाणादरम्यान कोसळले. हे धरण पंजाबमधील पठाणकोटपासून 30 किमी अंतरावर आहे. तपास पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

Indian Army helicopter crashes in Jammu Kashmir
Jammu-Kashmir: सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक

पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, रणजीत सागर धरणात लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले. "आम्हाला लष्कराचे हेलिकॉप्टर तळ्यात कोसळल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही आमची टीम घटनास्थळी पाठवली आहे,"

याअगोदरही याच वर्षी मे महिन्यात भारतीय हवाई दलाचे एक मिग -21 विमान कोसळले होते , ज्यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला होता . हा अपघात बाघापुराणा ते मुदकी रस्त्यावरील लांगेयाना नवन गावाजवळ मोगा शहरापासून सुमारे 28 किमी अंतरावर झाला होता, अपघातापूर्वी विमानाच्या पायलटने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उडी घेताना विमानाने काही जड उपकरणांना धडक दिल्याने वैमानिकाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com