Independence Day 2023: 7 दशकांनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील शेवटच्या गावाला मिळाली मोठी भेट, तुम्हीही...

Bhagat Singh Bridge: 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या डन्ना गावातील लोकांना मोठी भेट दिली आहे.
Jammu & Kashmir
Jammu & KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

Bhagat Singh Bridge: 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या डन्ना गावातील लोकांना मोठी भेट दिली आहे. भारतीय लष्कराच्या होनहार अभियंत्यांनी 115 फूट लांबीचा पूल बांधून 7 दशकांनंतर हजारो लोकांना मोठ्या संकटातून मुक्त केले आहे.

यानंतर हजारो गावकऱ्यांचा प्रवास सुरळीत होईल. हे गाव काश्मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये येते, ज्याला भारत-पाकिस्तान सीमेवरील शेवटचे गाव म्हटले जाते. हा 11 फूट लांबीचा पूल 'भगत सिंह' या नावाने ओळखला जाणार आहे.

पुलाला शहीदांचे नाव

दरम्यान, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या दिवंगत मेजर भगत सिंह यांच्या नावावरुन या पुलाला नाव देण्यात आले आहे. या शौर्याबद्दल त्यांना 'वीरचक्र' देण्यात आले.

भारतीय लष्कराचे (Indian Army) जवान आणि इतर स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत 1971 सालचे 90 वर्षीय सैनिक आणि स्थानिक रहिवासी शिपाई मियाँ गुल खान यांच्या हस्ते रिबन कापून त्याचे उद्घाटन करण्यात आले.

Jammu & Kashmir
Independence Day 2023: श्रीनगरच्या लाल चौकात नागिन डान्स, स्वातंत्र्याच्या जल्लोषात लोक तल्लीन, Video

दुसरीकडे, हा पूल भारतीय लष्कराच्या अभियंत्यांच्या अथक परिश्रमाने बांधण्यात आला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सतत पाऊस आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी दोन महिने मेहनत घेतल्याचे वृत्त आहे. हा पूल भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेली भेट आहे.

Jammu & Kashmir
Watch Video: राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात फडकावला तिरंगा; उद्या होणार भारत जोडो यात्रेचा समारोप

तसेच, हा पूल अस्तित्वात आल्यानंतर स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः येथे राहणाऱ्या मुलांना शाळेत जाणे सोयीचे होईल. याशिवाय आजारी व्यक्ती आणि वृद्धांनाही याचा फायदा होणार आहे.

यासाठी येथील जनतेने भारतीय लष्कराचे मनापासून आभार मानले आहेत. त्याचबरोबर, पर्यटकांची रेलचेलही वाढेल. रोजगाराच्या (Employment) नव्या संधी निर्माण होतील, अशीही त्यांना आशा आहे.

शनिवारी, स्वातंत्र्य दिनापूर्वी लष्कराने बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) एका पुलाचे उद्घाटन केले. याच्या मदतीने लोकांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com