Watch Video: राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात फडकावला तिरंगा; उद्या होणार भारत जोडो यात्रेचा समारोप

राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraDainik Gomantak
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir: राहुल गांधी यांची काँग्रेसची भारत जोडो यात्रा काश्मिरमध्ये पोहचली आहे. अनेक राज्यांचा प्रवास करत राहुल गांधींची पदयात्रा श्रीनगरमध्ये पोहचली आहे. आज राहूल यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावला आहे.

गेल्या 145 दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेने 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 1970 किलोमीटरचे अंतर कापत काश्मिर गाठले आहे. त्यानंतर आता उद्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) श्रीनगरमध्ये समारोप होणार असून त्यासाठी विरोधी पक्षातले अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काश्मिरमधून पदयात्रा करत राहुल गांधी आज सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. भारत जोडो यात्रा लाल चौकात येताच कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाजी सुरू केली.

त्यानंतर राहुल गांधींनी लाल चौकात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण केले आहे. यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. देशातील 12 राज्यांमध्ये राहुल गांधी यांनी पदयात्रा करत भाजपविरोधात रान पेटवले होते.

यात त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. द्वेष आणि कपटच्या राजकारणाला छेद देत लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही राहुल गांधींनी केले होते. तसेच या यात्रेत अनेक बॉलिवुड कलाकारांनीही सहभाग घेतला होता. आता 145 दिवसांनंतर भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे.

श्रीनगरमध्ये उद्या म्हणजेच 30 जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने देशातील 12 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय जनता दल, जनता दल , सीपीआय , केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com